इराकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराकमधील एरबिल येथील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट (Bomb Blast Near US Embassy) घडवण्यात आला आहेत. एबीसी न्यूजने इराकी संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (Iranian Revolutionary Guard Corps ) ने घेतल्याचीही माहिती आहे.
[read_also content=”“धोखेका जवाब बदले से…” अंगावर शहारे आणणारा ‘फायटर’चा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर कौतुकांचा पाऊस! https://www.navarashtra.com/movies/hrithik-roshan-deepika-padukone-film-fighter-trailer-praised-by-fans-on-social-media-nrps-498349.html”]
रिपोर्ट नुसार, IRGS ने हेरांच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे, तसेच इराकी हद्दीत जमलेल्या इराणी विरोधी दहशतवाद्यांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. दुसरीकडे, हुथींनी लाल समुद्रात एका अमेरिकन जहाजावरही हल्ला केला आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (ITGS) च्या ताज्या हल्ल्यात चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. एबीसी न्यूजने वृत्त दिले आहे की, अमेरिकन सैन्यासोबत कोणतीही चकमक झाली नाही आणि बॉम्बस्फोटात कोणतेही लोक मारले गेले नाहीत. एरबिलजवळील इराक विमानतळाजवळ कोलिशन फोर्सेसने तीन ड्रोन पाडल्याचेही वृत्तात म्हटले आहे.






