
Nepal Earthquake
नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हे बझांग जिल्ह्यातील माउंट सैपाल येथे होते. तसेच NEMRC च्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतामध्ये बाजुराहसर काही शेजारच्या जिल्ह्यांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंझांगमध्ये झालेल्या या भूकंपामुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. बझांग हा नेपाळमधील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्र आहे. हे त्रे6 टेक्टॉनमिक झोनमध्ये असल्यामुळे येथे सतत भूकंपाचे झटके जाणवत असतात. सध्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु याची तीव्रता जास्त नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.
आठवड्यापूर्वीच नेपाळच्या कास्कीमध्ये झाला होता भूकंप
यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी नेपाळच्या गंडकी प्रांतात कास्की जिल्ह्यात भूकंपाचे झटके जाणवले होते. हा भूकंप ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे शेजारच्या बालुंग, लामजुंग आणि स्यांगजा जिल्ह्यातमध्येही हा याचा झटका जाणवला होता.
पृथ्वीच्या आत सात टेक्टनिक प्लेट्स आहेत. ज्या सतत फिरत असतात आणि एकमेकांवर आदळतात. याला फॉल्ट लाइन असे म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. यामुळे जास्त दाब तयार होतो आणि घर्षण निर्माण होते. यामुळे घर्षणातून निर्माण होणारी उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. जिथे जास्त प्रमाणात या प्लेट्सची हालचाली होते त्या भागात भूकंप होतात.
नेपाळ हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. कारण तो भारत आणि युरेशियन या दोन मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर स्थित आहे. या टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर सतत आदळत असतात. ज्यामुळे सतत घर्षण होते आणि उर्जा बाहेर पडत असते. यामुळे नेपाळमध्ये सतत भूकंप होतात. नेपाळ हा जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे.
Bangladesh Earthquake : पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही मोठा भूकंप; बंगालमध्ये जमीन हादरली…
Ans: भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये सुदूर पश्चिम प्रांत बझांगमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
Ans: नेपाळच्या बंझामधील भूकंपात कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.