Myanmar Earthquake : भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार झटके; नागरिकांमध्ये प्रचंड घबराट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Myanmar Earthquake News in Marathi : नेपिदाव : भारताच्या शेजारी देश म्यानमारमध्ये (Myanmar) भूकंपाचे दोन जोरदार झटके बसले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक भूकंप रविवारी सकाळी (१६ नोव्हेंबर) झाला. तर याच्या दोन दिवसापूर्वी १४ नोव्हेंबर रोजी एका भूकंपाची (Earthquake) नोंद करण्यात आली होती.
Myanmar Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला म्यानमार; लोकांमध्ये भीतीचे वातारण
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत दोन भूकंप झाले आहेत. यामध्ये एक रविवारी सकाळी (१६ नोव्हेंबर) रोजी ३.५ तीव्रतेचा भूकंप नोंदवला. याची खोली १० किलोमीटर खोल होती. तर दुसरा भूकंप १४ नोव्हेंबर ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला. या दोन भूकंपामुळे स्थानिकांणध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारतीय वेळेनुसार, पहाटे २.४० मिनिटांनी भूकंपाची नोंद करण्यात आली.
या कमी तीव्रतेच्या भूकंपांना भूगर्भशास्त्रज्ञांनी उथळ भूकंप म्हटले आहे.हे भूकंप जमिनीच्या अगदी जवळ होतात. यामुळे याची ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर अधिक जाणवते. ज्यामुळे इमारतींमध्ये तीव्र कंपने निर्माण होतात आणि नुकसानीचा धोका वाढतो.यापूर्वी मार्च २०२५ मध्ये देखील म्यानमारमध्ये सर्वात शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्याने ३५०० हून अधिक लोकांचा बळी घेतला.
म्यानामार हे भूकंपप्रवण आणि नैसर्गिक आपत्ती क्षेत्र आहे. या भागात भूंकपाचे झटके, लांब किनारपट्टीमुळे त्सुनामीचा धोका सतत येत असतो. म्यानमारचा प्रदेश हा चार टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजेच भारतीय, युरेशियन, सुंडा आणि बर्मा प्लेट्सच्या जंक्शनवर स्थित आहे. यामुळे या भागात प्लेट्सच्या सतत हालचाली होत असतात. या प्लेट्सच्या हालचालींमुळे घर्षण तयार होते, ज्यामुळे म्यानमारमध्ये सतत भूकंप आणि त्सुनामीचा धोका असतो.
म्यानमारचे भूगर्भीय क्षेत्र १,४०० किलोमीटर लांबीचे आहे. हे क्षेत्र अंदमान विस्तार केंद्राला उत्तरेकडे जोडलेले आहे. याला सागिंग फॉल्ट असे म्हटले जाते. यामुळे या भागात सागिंग, मंडाले, बागे आणि यांगून सारख्या प्रदेशांमध्ये भूकंप सतत होत असतात. म्यानमारच्या लोकसंख्येपैकी ४६% लोकसंख्या या प्रदेशांमध्ये राहते. यामुळे येथील लोकांचे जीवन सतत धोक्यात असते. नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे देखील परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
Ans: पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.
Ans: म्यानमारमध्ये १९०३ मध्ये बागो प्रदेशात ७.० तीव्रतेचा भूकंपाचे झटके जाणवले होते याचा परिमाण यांगूनपर्यंत जाणवला होता.
Ans: म्यानमार हे चार टेक्टोनिक प्लेट्सच्या म्हणजेच भारतीय, युरेशियन, सुंडा आणि बर्मा प्लेट्सच्या जंक्शनवर स्थित आहे. या प्लेट्सचे एकमेकांवर आदळल्याने घर्षण होते आणि उर्जेचा विस्फोट होतो. यामुळे या भागामध्ये सतत भूकंप होत असतात.






