400 kg enriched uranium missing in Iran after US strike
400 kg enriched uranium missing : अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अणुसुविधांवर हवाई हल्ले केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी खुद्द कबूल केले आहे की, इराणमधून ४०० किलो अत्यंत समृद्ध युरेनियम गायब झाले आहे. ही बाब केवळ पश्चिम आशियात नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चिंतेची ठरू शकते, कारण या प्रमाणातल्या युरेनियमपासून १० अणुबॉम्ब तयार होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपाध्यक्ष व्हान्स यांनी म्हटले की, “इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुउद्योग स्थळांवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर, ४०० किलो युरेनियम गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे.” हे युरेनियम ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध असून, अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेला ९० टक्क्यांपर्यंतचा स्तर गाठायला फक्त काही आठवडे लागले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हान्स यांनी म्हटले की, “या मोहिमेचा उद्देश फोर्डो अणुउद्योगस्थळ नष्ट करणे आणि इतर सुविधांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवणे हा होता. या हल्ल्यांमुळे इराणची आण्विक क्षमता आता मोठ्या प्रमाणात खिळखिळी झाली आहे.” मात्र, हे युरेनियम अचूक कुठे गेले याविषयी अजूनही गूढ कायम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Axiom-4 mission Launch : आज राष्ट्रपुत्र शुभांशू शुक्ला इतिहास रचणार; 12 वाजता निघणार अंतराळ मोहीम
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी उपग्रह प्रतिमांमध्ये फोर्डो अणुस्थळाजवळ १६ ट्रक दिसले होते, जे सामग्री सुरक्षित स्थळी हलवत होते. हे ट्रक एका डोंगरात असलेल्या तटबंद सुविधेकडे वळताना दिसले, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये हल्ल्याची घाई झाली. या ट्रकसह संपूर्ण युरेनियम साठा, संशोधन उपकरणे आणि अणू साहित्य इस्फहानजवळील गुप्त भूमिगत केंद्रात हलवण्यात आले असावे, असा विश्वास अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्थांना आहे.
Tonight, Iran still has 400kg of enriched Uranium. “Somewhere”
The Ayahtollah Ali Khamenei is still in power.
Iranians are on the street proclaiming Victory. The vast majority of its missile forces intact.
And Israels “impregnable” defences dont look so impregnable anymore pic.twitter.com/UakqV9KMum
— Chay Bowes (@BowesChay) June 24, 2025
credit : social media
अंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत फोर्डो साइटवर पुनः तपासणीची मागणी केली आहे. मात्र, इराणकडून ती मंजूर होण्याची शक्यता कमी वाटते. इराणने NPT (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) मधून बाहेर पडण्याची धमकी दिली असून, त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे ‘स्वतंत्र आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावापलीकडे’ असेल, अशी भाषा वापरू लागला आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री तख्त रवंची यांनी थेट सांगितले की, “आम्हाला कोणीही आदेश देऊ शकत नाही. आमच्या सार्वभौमतेला जर धोका निर्माण झाला, तर आमचा अणुकार्यक्रम अधिक वेगाने पुढे जाईल.”
या संपूर्ण घडामोडीत अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची विश्वासार्हता देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हल्ल्यापूर्वी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी इराण “सध्या अणुबॉम्ब विकसित करत नाही” असे सांगितले होते. परंतु आता तेच अधिकृत अधिकारी म्हणत आहेत की इराण “काही आठवड्यांत अणुबॉम्ब तयार करू शकतो.” यामुळे संपूर्ण हल्ल्याची वैधता, उद्देश आणि त्यामागील नियोजनावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
४०० किलो अत्यंत समृद्ध युरेनियम गायब झाल्याची बाब ही जागतिक सुरक्षेसाठी गंभीर चिंता बनली आहे. IAEA, अमेरिकन गुप्तचर संस्था, इस्रायली गुप्तचर विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघ यांच्यासाठी ही बाब उच्चतम सुरक्षा अलर्टवर जाण्याइतकी गंभीर आहे. जर हे युरेनियम इराणने कोणत्या तिसऱ्या पक्षाकडे किंवा अज्ञात ठिकाणी हलवले असेल, तर ते भविष्यातील अणुहल्ल्याचा किंवा सौदेबाजीचा भाग म्हणून वापरले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistani Major Moiz Abbas: विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी मेजर मुईझ ठार; TTPने घेतली जबाबदारी
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणमधून गायब झालेले ४०० किलो युरेनियम हे आंतरराष्ट्रीय राजकारण, सुरक्षा आणि कूटनीतीसाठी मोठे आव्हान आहे. या युरेनियमचा नेमका ठावठिकाणा लवकरात लवकर शोधणे, ही जागतिक संस्थांसमोरची सर्वात मोठी जबाबदारी आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेची भूमिका सुद्धा आता अंतर्विरोधाने भरलेली दिसत असून, या संपूर्ण प्रकरणावर लवकरच नवे वळण येण्याची शक्यता आहे.