
42 Indian Umrah piligrims dies in Saudi Bus accident
Saudi Arabia Road Accident : रियाध : एक मोठी बातमी आहे. सौदी अरेबियात (Saudi Arabia) भीषण अपघात घडला आहे. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यामध्ये ४२ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यातील बहुतेक प्रवासी तेलंगणाच्या हैदराबादमधील होते. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बस आणि टॅंकरच्या धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
सौदी अरेबियात भीषण अपघात, ९ भारतीय नागरिकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार मक्काहून मदीनाला जाणाऱ्या एका बसचा अपघात घडला आहे. बसची एका डिझेल टॅंकशी जोरदार धडक झाली. यामुळे हा अपघात घडला. या घटनेनंतर आपत्कालीन सेवांनी तातडीने धाव घेतली. सध्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बसमध्ये सर्व भारतीय प्रवासी होते. उमराह यात्रा पूर्ण करुन मदीनला परतत होते. पण यावेळी अचानक हा दुर्दैवी अपघात घडला आणि ही उमराह यात्रा ४५ भारतीयांची शेवटची यात्रा ठरली. धडक झाल्यानंतर बसला प्रचंड आग लागली होती.
सौदी अरेबियातील या अपघातावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी घटनेची माहिती मिळताच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची आणि अपघात कसा घडाला यांची सर्व माहिती मिळवण्याचे आदेश मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना दिली आहे.
సౌదీ అరేబియాలో భారతీయ యాత్రికులతో ఉన్న బస్సు ఘోర ప్రమాదంపై ముఖ్యమంత్రి శ్రీ @revanth_anumula గారు తీవ్ర దిగ్బ్రాంతి వ్యక్తం చేశారు. మక్కా నుంచి మదీనా వెళ్తుండగా ఈ ప్రమాదం జరిగిందని, అందులో హైదరాబాద్ వాసులు కూడా ఉన్నారని వస్తున్న ప్రాథమిక సమాచారంపై వెంటనే స్పందించిన ముఖ్యమంత్రి… — Telangana CMO (@TelanganaCMO) November 17, 2025
तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील या अपघातवर (Accident) शोक व्यक्त केला आहे.जयशंकर यांनी म्हटले की, सौदी मदीना येथे झालेल्या अपघातामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. जखमींच्या बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पुढे म्हटले की, रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाच्या आम्ही संपर्कात आहोत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
Deeply shocked at the accident involving Indian nationals in Medinah, Saudi Arabia. Our Embassy in Riyadh and Consulate in Jeddah are giving fullest support to Indian nationals and families affected by this accident. Sincere condolences to the bereaved families. Pray for the… — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 17, 2025
सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने उमराह यात्रेकरुंसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दरवर्षी हजारो भारतीय मक्का-मदीना मार्गावरुन उमराह आणि हज यात्रेसाठी प्रवास करतात. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
In view of a tragic bus accident near Madina, Saudi Arabia, involving Indian Umrah pilgirms, a 24×7 Control Room has been set up in Consulate General of India, Jeddah. The contact details of the Helpline are as under: 8002440003 (Toll free)
0122614093
0126614276
0556122301… — India in Jeddah (@CGIJeddah) November 17, 2025
सौदी अरेबियात मोठी दुर्घटना; रस्ते अपघातात 9 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू