File Photo : Accident
सौदी अरेबियातून भीषण अपघात झाला असून ९ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमे जीझाननजीक हा अपघात झाला. या नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला जात आहे. या घटनेवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे. आज (२९ जानेवारी) सौदी अरेबियाच्या सौदी अरेबियाच्या पश्चिम प्रदेशातील जिझानजवळ रस्त्यावर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय अनेकजण जखमी देखील झाले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली आहे.
Grieved to learn of this accident and the loss of lives. Spoke with our Consul General in Jeddah, who is in touch with the concerned families. He is extending fullest support in this tragic situation. https://t.co/MHmntScjOT — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 29, 2025
सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने यासंदर्भात माहिती एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली आहे. ‘जिझानजवळच्या दुर्घटनेमुळे आम्ही दु:खी आहोत. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण सहकार्य करत आहे. दूतावासातील अधिकारी हे पीडित नागरिकांचे कुटुंबीयाच्या संपर्कात आहेत’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय पोस्टमध्ये काही हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, घडलेली अपघाताची दुर्घटना वेदनादायक आहे. जेद्दाहमधील आमच्या कौन्सुल जनरलशी संवाद झाला आहे. त्यांनी संंबंधितांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला आहे. जनरल या घटनेमधील पीडितांना संपूर्णपणे सहकार्य करत आहेत.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चेंगराचेंगरीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदिनाथ भावुक झाले होते. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ही घटना अत्यंत दुःखद आहे. भक्तांच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे, हा प्रसंग मला खूपच वेदना देणारा आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती संवेदना आहेत. आम्ही काल रात्रीपासून न्यायाधिकरण आणि पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि जे काही व्यवस्था करता येईल ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने आम्ही मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. न्यायिक आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल. या संदर्भात, मुख्य सचिव आणि डीजीपी स्वतः एकदा प्रयागराजला भेट देतील आणि गरज पडल्यास त्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ही घटना हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबियांप्रती आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही काल रात्रीपासून प्रशासनाशी सतत संपर्कात आहोत. निष्पक्ष अधिकारी, पोलिस, प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर सर्व व्यवस्था तेथे तैनात करण्यात आल्या आहेत.






