
नेपाळमध्ये पुराचा कहर; अनेकांचा मृत्यू, पुराच्या पाण्यासोबतच येत आहेत मृतदेह
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे झालेला विध्वंस चिंताजनक आहे. मोठ्या संख्येने भारतीय बेपत्ता आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरात आत्तापर्यंत 579 जणांचा मृत्यू झाला असून, 1545 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 1924 अजूनही बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाची (IAF) विमाने मदत आणि बचाव कार्यात साहाय्य करत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशची सीमा नेपाळला लागून आहे, त्यामुळे संवेदनशील भागांतील आणि नद्यांमधील पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कैलाश मानसरोवर यात्रा पूर्ण करून आंध्र प्रदेशातील २८ यात्रेकरू घरी परतणार आहेत. आयोजक संस्थेचे संचालक व्यंकटरमण यांच्या म्हणण्यानुसार, हा ग्रुप २१ ऑगस्ट रोजी नेपाळला गेला होता. पूरग्रस्त भागातून वाहन सुमारे पाच मिनिटे आधीच निघाले होते. सर्व यात्रेकरू सुरक्षित असून कोणीही जखमी झालेले नाही. हा ग्रुप नेपाळहून दिल्लीत दाखल होईल, जिथून ते विशाखापट्टणम आणि हैदराबादमार्गे वेगवेगळ्या विमानांनी मायदेशी परततील.
शुक्रवारी दुपारी चीनमधून ५३ भारतीय नागरिक नेपाळमध्ये दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील ३७ जणांचा समावेश आहे. सर्व भारतीय नागरिक नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोहोचले आहेत. हा ग्रुप नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या ग्रुपने चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते काठमांडूमध्ये पोहोचले. या ५३ भारतीयांच्या ग्रुपचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यात ते एकत्र दिसत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या गटात महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
नेपाळमध्ये बचावकार्य सुरु
भारताने शुक्रवारी पूरग्रस्त नेपाळला आपली तिसरी खेप म्हणून १० टन मदत साहित्य, ११ वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे एक पथक आणि बोगद्यातील बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी एक पथक पाठवले.