Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू

Nagpur News : नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ नागपूरकरांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रवासातील अडथळ्यांमुळे त्यांना पुन्हा काठमांडूकडे परतावे लागले. त्यामुळे नागपूरकरांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 28, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मदत करण्याची विनंती
  • सर्वानी सुटकेचा श्वास सोडला
  • सर्व यंत्रणा कामाला लागली
  • परमिटसाठी बस थांबवली
Nagpur News : उपराजधानीच्या विविध भागांतील तब्बल ११५ भाविक व पर्यटक नेपाळमधील महाप्रलयाच्या तडाख्यातून बालबाल बचावले. सर्व सुखरूप आहेत. गुरुवारी सायंकाळी काठमांडू येथून जनकपूरकडे चार लहान बसेसद्वारे निघाले. मात्र, अचानक हवामान बदलल्याने रात्री ११.१५ वाजता परत काठमांडूला गेले. यातील दहा प्रवाशी सकाळीच निघाले.

नागपुरातील श्रीधर महाराज यांच्या माध्यमातून ११५ जणांचा जत्था २२ तारखेला नेपाळकडे निघाला. २३ तारखेला गोरखपूर येथे पोहोचल्यानंतर दोन ट्रव्हल्सनी २४ तारखेला काठमांडू येथे पोहचले. धार्मिक विधी, महाशिवपूरणानंतर काही पर्यटन स्थळांचा आनंद लुटला. नागपूरकरांच्या नियोजित कार्यक्रमानुसार सर्व प्रवासी गुरुवारी निघणार होते. मात्र, निसर्गाचा प्रकोप नेपाळवर बरसला आणि दोन्ही बसेस मोठ्या असल्याने पुढील प्रवासासाठी थांबवल्या. सर्व प्रवासी पशुपतीनाथच्या पार्किंगमध्ये अडकले.

चार नागपूरकर सागा काउंटित सुरक्षित : मानसरोवर परिक्रमा पूर्ण करून
काठमांडूकडे परतणाऱ्या चार नागपूरकर भाविकांना संकटाचा सामना करावा लागला. हे नागरिक सध्या चीनमधील सागा काउंटी परिसरात सुरक्षित ठिकाणी थांबले आहेत. त्यांच्यासोबत गुजरातमधील वडोदरा येथील त्यांचे काही मित्र एकत्र आहेत.

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

यामध्ये स्वावलंबीनगर येथील रहिवासी व शासकीय कंत्राटदार सचिन जिरापुरे, पत्नी डॉ. रश्मी जिरापुरे (त्वचाशास्त्रज्ञ), राम कूलरचे ओनर
राजेश अवचट आणि त्यांच्या काकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी राजेश अवचट यांनी कुटुंबियांना सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान राजेश यांचे बजू राकेश अवचट नेपाळला जाणार आहेत.

मदत करण्याची विनंती

नागपुरातील प्रवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तातडीने यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काठमांडूचे खासदार संदीप राणा यांच्याशी संपर्क साधून नागपुरातील प्रवाशांची माहिती दिली. तसेच आवश्यक मदत करण्याची विनंती केली. खासदार संदीप राणा यांनी गुरुवारी सकाळीच नागपूरकरांची प्रत्यक्ष भेट घेतली. स्थानिक प्रशासनाला कामाला लावले. प्रवाशांची विचारपूस करून पुढील प्रवासाची व्यवस्था केली. चार लहान बसेस उपलब्ध करून दिल्या, या बसेसला जाण्याची परवानगीदेखील मिळवून दिली.

सर्वानी सुटकेचा श्वास सोडला

बसेसची व्यवस्था होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सायंकाळी ५ वाजता सर्व प्रवासी काठमांडूहून जनकपूरकडे मायदेशी परतण्यासाठी निघाले. रात्रीच्या ८.३० वाजता अचानक हवामान बदलल्याने परत जाण्याचा निर्णय घेतल्या. आता शुक्रवारी पहाटे निघतील. सकाळी निघालेले दहा प्रवासी जनकपूरमध्ये एकत्र येतील.

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सर्व यंत्रणा कामाला लागली

काठमांडूमध्ये प्रवासी अडकल्याचे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व अन्य विभागांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.

परमिटसाठी बस थांबवली

काठमांडूहून १५-२० किलोमीटर अंतर पार
कैल्यानंतर नागपूरकरांब्या चारही बसेस थांबवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्क ठेवून प्रवाशांकडून माहिती घेत आहेत. बसेस थांबल्यानंतर थोडचाच वेळात मुख्यमंत्र्यानी प्रवाशांची संपर्क साधला. प्रवाशानी परमिटची अडचण सांगताच मुख्यमंत्र्यांनी परत यंत्रणाला कामाला लावली. मात्र, नंतर वातावरणाने दगा दिला.

Web Title: Nagpur news 115 nagpur residents in nepal set out for home but forced back to kathmandu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Nagpur News
  • Nepal Flash Flood

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
1

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!
2

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
3

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.