Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर

Kyrgyzstan ancient city : या शोधाने तज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंसह असंख्य विटांच्या रचना सापडल्या आहेत. यामध्ये बुडालेल्या दगडी रचना आणि लाकडी तुळया यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 17, 2025 | 01:31 PM
600-year-old Islamic city found in Kyrgyzstan remains of mosques and schools also revealed

600-year-old Islamic city found in Kyrgyzstan remains of mosques and schools also revealed

Follow Us
Close
Follow Us:
  1. किर्गिस्तानच्या इसिक-कुल सरोवराखाली 15व्या शतकात भूकंपाने नष्ट झालेले प्राचीन शहर सापडले.

  2. उत्खननात मशीद, शाळा, स्मशानभूमी, दैनंदिन वस्तू, विटांच्या रचना आणि लाकडी सांगाडे आढळले.

  3. इस्लामिक दफन पद्धतींचे पुरावे आढळल्याने हे शहर सिल्क रोडवरील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते, असा तज्ञांचा निष्कर्ष.

Kyrgyzstan ancient city discovery : किर्गिस्तानमधील जगप्रसिद्ध इसिक-कुल (Issyk-Kul) सरोवरात नुकताच झालेला पुरातत्त्वीय शोध संपूर्ण वैज्ञानिक जगताला थक्क करून गेला आहे. प्लेटोने वर्णन केलेल्या अटलांटिस या पौराणिक शहराची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे आणि त्याला कारण आहे या सरोवराखाली सापडलेला प्राचीन बुडालेला नगरीय संकुल.

रशियन (Russia) अकादमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी इसिक-कुलच्या वायव्य किनाऱ्याजवळील तोरू-आयगीर क्षेत्रात उत्खनन करताना हा अद्वितीय वारसा उघडकीस आणला. संशोधकांनी ३ ते १३ फूट उथळ पाण्यात चार वेगवेगळ्या भागांचे सर्वेक्षण केले आणि तेथे त्यांना विटांच्या प्रचंड रचना, लाकडी तुळया, दगडी बांधकामे आणि दैनंदिन वापरातील वस्तू आढळल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Unrest: ढाक्यात हाय-अलर्ट! शेख हसीना यांच्या निकालापूर्वीच हिंसाचाराचा भडका; स्फोट–दंगल–बंदचा कहर

१५व्या शतकातील विनाशकारी भूकंपाने शहर गिळंकृत झाले?

इतिहास अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण वसाहत १५व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या भीषण भूकंपात उद्ध्वस्त झाले. या भागात एकेकाळी व्यापाराची मोठी केंद्रे होती आणि इसिक-कुल हे सिल्क रोडच्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मानले जात होते. चीनपासून भूमध्य समुद्रापर्यंत व्यापारी या मार्गाने रेशीम, मसाले, धातू आणि इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करीत असत. तज्ञ कोनस्तांतीन कोल्चेन्को यांच्या मते भूकंपाच्या आधीच या शहरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले असावेत. काही शतकांनंतर येथे भटके समुदाय स्थायिक होऊ लागले, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

काय सापडले? मशीद, शाळा की स्नानगृह?

उत्खननात सापडलेल्या वास्तूंचे स्वरूप पाहता त्या सार्वजनिक इमारती असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यापैकी एक इमारत मशीद, मदरसा (शाळा) किंवा स्नानगृह असू शकते. त्याशिवाय जवळपास तीन भागात मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीचे अवशेष सापडले आहेत. गोल आणि आयताकृती आकाराच्या मातीच्या विटांच्या कबरी, तसेच व्यवस्थित बांधकामाचे तटबंदी प्रकारचे अवशेष आढळले. हे सर्व पाहता येथे पूर्वी एक घनदाट लोकवस्तीचे प्राचीन शहर अस्तित्वात होते, हे स्पष्ट होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

इस्लामिक दफन पद्धतींचे पुरावे

सापडलेल्या सांगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला, सर्व सांगाडे उत्तरेकडे तोंड करून, किब्लाकडे (मक्केकडे) दिशाभिमुख स्थितीत दफन केलेले होते. हीच पद्धत इस्लामिक दफन परंपरेचा मुख्य भाग असल्याने, या प्रदेशात इस्लामी संस्कृतीचे प्रभावी अस्तित्व होते, हे सिद्ध झाले.

सरोवराखाली लपलेली संस्कृती

इसिक-कुल सरोवर जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात खोल सरोवर आहे. इतक्या खोल पाण्याखाली एवढ्या प्रमाणात शहरी संस्कृतीचे अवशेष मिळणे ही एक अभूतपूर्व घटना मानली जात आहे. सध्या तज्ञांनी सापडलेल्या सर्व वस्तूंचे वैज्ञानिक विश्लेषणासाठी नमुने पाठवले आहेत. या चाचण्या झाल्यानंतर या शहराचे अचूक वय, त्याचा व्यापारी इतिहास आणि भूकंपाच्या तीव्रतेबाबत अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. आज तलावाच्या किनाऱ्यावर लहान गावे आहेत, पण काहीशे वर्षांपूर्वी येथे एक समृद्ध आणि भरभराटीचे शहर फुलले होते, हे या शोधामुळे सिद्ध झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इसिक-कुल सरोवराखाली काय सापडले?

    Ans: मशीद, शाळा, स्मशानभूमी, विटांच्या रचना आणि दैनंदिन वस्तूंनी भरलेले प्राचीन इस्लामी शहर.

  • Que: हे शहर कोणत्या काळातील आहे?

    Ans: हे शहर सुमारे 15व्या शतकातील असून भूकंपाने नष्ट झाले असल्याचा अंदाज आहे.

  • Que: या शोधाचे महत्त्व काय?

    Ans: हे शहर सिल्क रोडवरील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते आणि इस्लामिक दफन परंपरांचे स्पष्ट पुरावे येथे आढळले.

Web Title: 600 year old islamic city found in kyrgyzstan remains of mosques and schools also revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • Earthquake
  • international news
  • Russia

संबंधित बातम्या

Earthquake In Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के! शेजारी देशही हादरला, किती झाले नुकसान?
1

Earthquake In Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के! शेजारी देशही हादरला, किती झाले नुकसान?

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
2

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई
3

Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात
4

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.