7.6 magnitude earthquake hits Caribbean Sea Tsunami warning issued
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, कॅरिबियन समुद्रात मोठा भूकंप झाला असून, याची तीव्रता 7.6 रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेच्या संयुक्त राज्य जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:23 वाजता केमैन आयलंडच्या दक्षिण-पश्चिमेस आला. भूकंपाची खोली 10 किलोमीटर इतकी मोजण्यात आली असून, याचे केंद्र केमैन आयलंडच्या जॉर्ज टाऊनपासून 209 किलोमीटर दक्षिण-पश्चिम दिशेला होते.
कॅरिबियन किनाऱ्यांवरील देश हादरले
हा भूकंप इतका तीव्र होता की, हैती, मेक्सिको, क्युबा, होंडुरास आणि बेलीज या कॅरिबियन किनाऱ्यालगत असलेल्या देशांमध्ये त्याचे जोरदार झटके जाणवले. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण पसरलेले असून, अनेक ठिकाणी लोक घराबाहेर पडले. तसेच, दक्षिण अमेरिकेतील होंडुरासच्या उत्तर भागातही 7.5 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसाइंसेजने (GFZ) सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता 6.89 अशी नोंदवली होती, पण नंतर 7.5 तीव्रता आणि 10 किलोमीटर खोली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
त्सुनामीचा धोका, लोकांना सतर्कतेचा इशारा
या तीव्र भूकंपाच्या धक्क्यानंतर यू.एस. त्सुनामी चेतावणी क्रेंद्राने कॅरिबियन समुद्रात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. हैती, बेलीज आणि बहामास या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. याशिवाय, प्युएर्तो रिको आणि वर्जिन आयलंडसाठी भूकंपाचा धोका कायम असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुनामी इशारा केंद्राने (National Tsunami Warning Center) सध्या मोठ्या सुनामीचा धोका नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहावे आणि अधिकृत सूचना मिळताच त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
भूकंपप्रवण क्षेत्र
कॅरिबियन समुद्र हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. याआधीही हैतीमध्ये 2010 मध्ये 7.0 तीव्रतेचा भूकंप होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे येथील प्रशासन अधिक सतर्क आहे. सरकारकडून सुरक्षिततेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देत आहे.
तसेच, आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी, भूकंप आणि त्सुनामीसंदर्भातील सतर्कता मोहीम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनपुढे ट्रम्पचा तोरा उतरला; अमेरिकेने कर लादण्याचा आदेश केला स्थगित