चीनपुढे ट्रम्पचा तोरा उतरला; अमेरिकेने कर लादण्याचा आदेश केला स्थगित (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अनेक निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवली. यामध्ये त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्यापासून ते चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याचा निर्णय, तसे जागतिक संघटनांमधून अमेरिकेची माघार या निर्णयांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी लादलेल्या करामुळे चीन, कॅनडा आणि मेक्सिकोने देखील प्रत्युत्तरात कर लादण्याची घोषणा केली होता.
त्यानंतर काही तासांनी ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाला 1 महिन्याची मुदत देत कर स्थगितीचा निर्णय घेतला. आता या निर्णयातून चीनला देखील सुटका मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या शुल्कचा आदेश काही काळासाठी स्थगित केला आहे. ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, वाणिज्य विभाग टॅरिफ प्रक्रिया आणि संकलन यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा कर लागू केला जाणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने आणखी 3 ओलिसांची केली सुटका; 183 पॅलेस्टिनीही लवकरच घरी परतणार
चीनवरील 10% कर लादण्याचा निर्णय स्थगित
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी कार्यकारी आदेशाद्वारे चीनमधून आयात होणाऱ्या विविध वस्तूंवर 10% कर लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, हा आदेश लागू होणयापूर्वी बुधवारी यामध्ये दुरुस्ती करण्यात आला आणि शुक्रवारपर्यंत हा बदल जाहीर करण्यात आला. व्हाईट हाउसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुरुस्तीमध्ये चीनवरील टॅरिफ लागू करण्यापूर्वी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री केली जाणार असून यामुळे निर्णय थांबबण्यात आला आहे.
इतर देशांवरही लादणार टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, पुढील आठवड्यापर्यंत अनेक देशांवर प्रत्युत्तरदाखल टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. त्यांनी हेही स्पष्च केले की, अमेरिकेचे व्यापार भागीदार देश अमेरिकन निर्यातांवर जितका टॅरिफ लावतात, तितकाच टॅरिफ अमेरिका त्यांच्या आयातांवर लावणार आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थसंकल्पीय तुटीला काही प्रमाणात मदत होईल. मात्र, ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर कर लागू होईल याबाबत अद्यप सांगितलेले नाही.
अमेरिका आणि जपान संबंध
डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान केली. ट्रम्प यांनी पंतप्रधान इशिबा यांचे स्वागत करत सकारात्क भावना व्यक्त केल्या. त्यांनी जाहीरपणे व्ही लव्ह जपान असे वक्तव्य केले. तसेच, पुढील आठवड्यात ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांच्याशी संवाद साधणार असल्याचे म्हटले. गाझा पट्टीच्या पुनर्विकासाबाबत कोणताही तातडीचा निर्णय घेण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.