8 Turkish soldiers die of suffocation in Iraq cave
बगदाद : एक मोठी दु:खद माहिती समोर आली आहे. इराकमध्ये तुर्कीच्या सैनिकांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे तुर्कीमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरी इराकमध्ये ही घटना घडली आहे. तुर्कीचे सैनिक इराकच्या उत्तरी गुहांमध्ये २०२२ च्या मारल्या गेलेल्या एका सहकारी सैनिकाचे अवशेष शोधण्यासाठी केले होते. यावेळी ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीचे सैनिक मिथेन वायूच्या संपर्कात आले. गॅस गळतीमुळे या गुहेत मिथेन वायू पसरला होता. यामुळे १९ सैनिक बाधित झाले, यातील ८ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.
तुर्कीच्या संरक्षण णंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मिथेन वायूमुळे बाधित झालेल्या सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील आठ जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप अपघाताच्या नेमक्या ठिकाणाचे नाव स्पष्ट करण्यात आलेले नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावर पसरलेले आहे. सध्या परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्लॉ-लॉक ऑपरेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात ही घटना घडली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये उत्तर इराकमध्ये कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीविरोधात (पीकेके) या भागात तुर्कीचे लष्करी ऑपरेशन सुरु होते.मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षीपूर्वी, २०२२ मध्ये या भागात अतिरेक्यांविरोधात गोळीबाराची घटना घडली होती.
यावेळी अनेक लष्करी अधिकारी मृत्यूमुखी पडले होते. या अधिकाऱ्यांच्या अवशेषांचा शोध नुकताच सुरु करण्यात आला होता. याच वेळी तुर्कीचे एक लष्करी युनिट मिथेन वायूच्या प्रभावात आले. गेल्या तीन वर्षांपासून येथे मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या अवशेषांचा शोध सुरु होता. परंतु अद्याप यामध्ये तुर्कीला यश मिळाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरी इराकमध्ये असलेली ही गुहा समुद्रसपाटीपासून ८५२ मीटर (२७९५ फूट) उंचीवर आहे. या गुहेचा वापर पुर्वी तात्पुरते रुग्णालया म्हणून केला जात होता, असे म्हटले जाते. २०२२ मध्ये त्यानंतर तुर्कीने यावर ताबा मिळवला होता. गेल्या चार दशकांपासून तुर्की आणि पीकेके यांच्यात संघर्ष सुरु होता. हा संघर्ष सीरियामध्ये देखील पसरला होता. सध्या तुर्कीने इराकमध्ये अनेक लष्करी तळे उभारली आहे. पीकेकेच्या अनेक भांगावरही तुर्कीने ताबा मिळवला आहे. तुर्की आणि पीकेकेमध्ये एक महत्त्वपूर्ण करार देखील करण्यात आला आहे.