फोटो सौजन्य: सोशल मीडिया
पॅरिस: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसकडे लागले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहेत. येत्या 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या निमित्ताने जगभरातून हजारो खेळाडू आणि लाखो क्रीडाप्रेमी पॅरिसला येणार आहेत. मात्र दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पॅरिसमध्ये 5 जणांनी मिळून एका महिलेसोबत गैरव्यवहार केला असल्याची घटना घडली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एका 25 वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली आहे. ही महिला मूळची ऑस्ट्रेलियन आहे. फ्रेंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलैच्या मध्यरात्री महिलेला मारहाण करून तिच्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, सदर महिला पॅरिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. यावेळी त्या ठिकाणी काही पुरूष तिथे पोहचले. त्यांनी अचानक तिला मारहाण करून तिला त्रास दिला. तिने तिथून कशीबशी सुटका करून बाहेर धाव घेतली. बाहेर जाऊन तिने लोकांना मदत मागितली तेव्हा एका महिलेने तिला मदत केली. महिलेवर बलात्कार करणाऱ्यांपैकी एक आरोपी तिच्या मागे आला होता. त्यावेळी तेथील लोकांनी त्याला मारहाण केली. पण तो आरोपी तिथून पळून गेला.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, 20 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर महिलेवर पाच जणांनी हल्ला करून तिचे लैंगिक शोषण केले. या घटनेचा अजून तपास सुरू आहे. अद्याप आरोपी पकडले गेले नाहीत.
ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास आणि फ्रेंच पोलीस पीडितेला मदत करत आहेत. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. अधिकारी म्हणाले, “मला या घटनेची माहिती मिळाली होती, ही अत्यंत दुःखद आहे.”