
Afghan Trade Minister Azizi in India on 5-day importat visit, know details
India-Afghanistan Relations : नवी दिल्ली/काबूल : गेल्या महिन्यात पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्येतीव्र संघर्ष सुरु होता. दोन्ही देशांमध्ये सीमांवर मोठी चकामक झाली. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चाही झाली. पण कोणताही तोडगा निघाला नाही. या चर्चेनंतर पाकिस्तानने अचानक अफगाणिस्तानसोबतचा व्यापर बंद केला आहे. यामुळे अफगाणिस्तानचे (Afghanistan) मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने भारताकडे धाव घेतली आहे.
अफगाणिस्तानचे उद्योग मंत्री आणि वाणिज्य मंत्री नूरुद्दीन अजीजी भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अजीजी दिल्लीमध्ये भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा करणार आहेत. हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
पाकिस्तानने सीमापार दरवाजे बंद करतान अफगाणिस्तानच्या व्यापारवर मोठा परिणाम झाला आहे. विशेष करुन फळे, कृषी उत्पादने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे अफगाण व्यापाऱ्यांचे १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या अफगाणिस्तान पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करण्याचा आणि त्याला पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या पाकिस्तानने सीमा बंद केल्याने तालिबान सरकारने भारताकडे कुटनीतिक धाव घेतली आहे. अफगाणिस्तानच्या उद्योग मंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांत व्यापार संबंधाना चालना देणार मानल जात आहे. तसेच तालिबान सरकार भारतासोबत इतर क्षेत्रातही संबंध दृढ करत आहे. काही आठवड्यांपूर्वीच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली होती.
यावेळी खनिज, उर्जा आणि पायाभूत सुविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांत द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर भारताने काबुलमध्ये दूतावास देखील सुरु केले. यामुळे दोन्ही देशांतील औपचारिक आणि राजकीय संबंधाना चालना मिळत असल्याचे दिसत आहे.
सध्या अफगाणिस्तान व्यापारासाठी नवीन बाजारपेठा शोधत आहे. चाबहार बंद, मध्य आशिया देश, तर चीनचा वाखान कॉरिडोर, हवाई मालवाहतूक आणि प्रादेशिक रेल्वे नेटवर्क यांसारखे पर्याय सध्या अफगाणिस्तानकडे आहे. या सर्व पर्यांयाचा विचार तालिबान सरकार करत आहे. तसेच भारतासोबत देखील समन्वय वाढवण्यावर भर देत आहे.
अजीजी भारतातील इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) मध्ये सहभागी होणार आहे. यामुळे अफगाण-भारताला व्यापार आणि गुंतवणूकीसाी नव्या संधी उपलब्ध होतील. सध्या अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अंत्यंत ढासाळली आहे. यामुळे त्यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण
Ans: अफगाणस्तानचे उद्योग मंत्री अजीजी पाच दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर असून त्यांच्या हेतू भारत-अफगाण व्यापार संबंध दृढ करणे आणि देशात गुंतवणूक वाढवणे आहे.
Ans: पाकिस्तानने सीमा बंद केल्यामुळे अफगाणच्या व्यापारांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना फळे, कृषी उत्पादने, आणि इतर मालांची निर्यात थांबली असून १०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत आहे.
Ans: सध्या तालिबान सरकार पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करण्याचा आणि देशाच्या विकासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारत एक मोठी बाजारपेठ असून तो एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देखील ठरु शकतो. यामुळे अफगाणिस्तान भारतासोबत संबंध मजबूत करत आहे.