अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India-Taliban Relations : नवी दिल्ली/काबूल : सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारने भारतीय नागरिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात होता. याच एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. परंतु भारताने या दाव्यांचे खंडने केले आहे. भारताच्या प्रेस एन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)ने कोणत्याही भारतीयाला तालिबानने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
सोशल मीडियावर तालिबानने सरकारने भारतीयांना ताब्यात घेतल्याच्या दाव्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पण हा दावा खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे. या संदर्भात PIB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. PIB ने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना २०११ चा आहे.
तसेच PIB ने लोकांना दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट व्हिडिओ, माहिती, अहवालांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती अधिकृत वेबसाइट्सवरुन पडताळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर PIB ने चुकिच्या माहितीचे निराकरणे केल आहे.
PIB ने लोकांना अशा खोट्या माहित्यांपासून सावध राहण्याचे म्हटले आहे. तसेच अशी काही माहिती आढळल्यास त्यांना अधिकृत हेल्पलाइन क्रमांक +९१ ८७९९७११२५९ किंवा factcheck@pib.gov.in यावर पडताळणीसाठी देण्याचे आवाहन केल आहे. अशी प्रकारची माहिती पडताळणी न करता पुढे न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
A social media post claims that the Taliban Government in Afghanistan has detained several Indians. #PIBFactCheck ❌ The claim made by this handle is #fake 💠 The video used is OLD and is from 2021. Link: https://t.co/KfeDNLh6ng ✅ Beware of fake propaganda being spread… pic.twitter.com/ay4VxdX9xo — PIB Fact Check (@PIBFactCheck) October 24, 2025
गेल्या काही काळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आहे. काबूलमध्ये भारताने आपला दूतावासा सुरु केला आहे, यावरुन तालिबान सरकार आणि भारत सरकारमधील राजनैतिक संबंध देखील सुधारत असल्याचे दिसून येते. शिवाय नुकतेच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांनी बारताला भेट दिली होती. या भेटीमुळे भारत आणि तालिबान राजनियक संबंध सुधारत असल्याचे दिसते.
प्रश्न १. सोशल मीडियावर तालिबान संबंधी काय दावा केला जात होता?
सोशल मीडियावर तालिबान सरकारने भारतीयांना ताब्यात घेतल्याचा दावा केला जात होता.
प्रश्न २. काय आहे तालिबानच्या भारतीयांना ताब्यात घेतलेल्या दाव्याचे सत्य?
तालिबानने कोणत्याही भारतीय व्यक्तीला ताब्यात घेतलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ २०११ चा असल्याचे भारताच्या PIB ने म्हटले आहे.
रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्…






