Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan earthquake: अफगाणिस्तानमध्ये विध्वंसाचे भयानक दृश्य; 622 मृत, ‘या’ VIRAL VIDEO मध्ये पहा भूकंपाची भीषणता

Afghanistan Earthquake: 1 सप्टेंबर 2025 रोजी पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 622 लोकांचा मृत्यू झाला. भूकंपाचे केंद्र जलालाबादपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर होते...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 01, 2025 | 01:51 PM
afghanistan earthquake 622 people lose lives these 4 videos gone viral

afghanistan earthquake 622 people lose lives these 4 videos gone viral

Follow Us
Close
Follow Us:

Afghanistan Earthquake 2025 : पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांत रविवारी रात्री एका भीषण आपत्तीने हादरून गेला. १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:४७ वाजता आलेल्या ६.० रिश्टर स्केलच्या भूकंपाने संपूर्ण जलालाबाद परिसराला मृत्यूचे छायाचित्र दाखवले. काही क्षणांतच डझनभर गावे कोसळली, हजारो लोक रस्त्यावर आले आणि ओरडणाऱ्या, किंचाळणाऱ्या लोकांचा आवाज संपूर्ण रात्री गुंजत राहिला.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, भूकंपाचे केंद्र जलालाबादपासून केवळ २७ किलोमीटर अंतरावर होते आणि त्याची खोली अवघी १० किलोमीटर. त्यामुळे हादरे अतिशय तीव्र आणि वरवरचे होते. आतापर्यंत ६२२ लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून १००० हून अधिक जखमी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

काही क्षणांत उद्ध्वस्त झालेल्या वस्ती

नांगरहार आरोग्य विभागाचे प्रवक्ते अजमल दरवैश यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान जलालाबाद शहर व त्याच्या आसपासच्या भागात झाले आहे. अनेक कुटुंबांनी आप्तेष्ट गमावले, घरांच्या ढिगाऱ्याखाली महिला, मुले अडकली. बचाव पथके रात्रभर ढिगाऱ्यातून जिवंत व मृतदेह बाहेर काढत होती. या धक्क्यानंतर केवळ २० मिनिटांत आणखी दोन भूकंपांनी अफगाणिस्तान हादरला एक ४.५ रिश्टर स्केलचा आणि दुसरा ५.२ रिश्टर स्केलचा. लोक भीतीने उघड्यावर धावले. घरांची छप्परे, भिंती, मशीदींचे मनोरे, शाळांची इमारती एका क्षणात कोसळल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Afganistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के, 509 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, शेजारी देशांनाही हादरे

हिंदूकुशची भीतीदायक स्मृती

अफगाणिस्तानाचा हा भाग हिंदूकुश पर्वतरांगेत येतो. येथे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे भूकंप वारंवार होतात. पण इतक्या कमी खोलीचा आणि सलग धक्के देणारा भूकंप अत्यंत विध्वंसक ठरला. वृद्ध, लहान मुले, झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब नागरिक हे सर्वात जास्त बळी गेले.

1 – भूकंपानंतर आपल्या प्रियजनांना शोधणारे लोक-

Big Breaking News 🚨🚨 20+ People died
120+ Others were injured
In Afghanistan, after a 6.2 magnitude earthquake Struck.
📍Jalalabad in Nangarhar Province Video 📷 #Afghanistan #AfghanistanEarthquake pic.twitter.com/q1GabcxQTx — Mayank (@mayankcdp) September 1, 2025

credit : social media and Twitter 

जखमींची आर्त हाक

रुग्णालयांमध्ये तुडुंब गर्दी झाली आहे. रक्त, औषधे, डॉक्टर यांची तीव्र कमतरता भासते आहे. जखमींचे नातेवाईक त्यांच्या शेजारी उभे राहून अश्रू ढाळत आहेत. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेले अनेक लोक गंभीर अवस्थेत आहेत. सामाजिक माध्यमांवर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये ढिगाऱ्याखालून हात हलवणारी मुले, अंधारात दिवे लावून शोधमोहिम करणारे बचावकर्ते ही दृश्ये हृदय पिळवटून टाकणारी आहेत.

2- अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा व्हिडिओ

د خپلو هېوادوالو لاس نیوی وکړئ#زلزله #کنړ pic.twitter.com/HcYsfWWm60 — Rahmatullah Andar🇦🇫 (@RahmatAndar1) September 1, 2025

credit : social media

जगाची सहवेदना

या भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय जगतातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी X (माजी ट्विटर) वर लिहिले –
“अफगाणिस्तानातील कुनार प्रांतातील भूकंपामुळे खोल चिंता व्यक्त होते आहे. या संकटाच्या काळात भारत अफगाण जनतेसोबत ठामपणे उभा आहे. पीडित कुटुंबांना संवेदना, जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.” भारताने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्रे आणि शेजारील पाकिस्ताननेही मदतीची घोषणा केली आहे.

622 people killed, hundreds are missing while over 2000 people are injured due to the deadly #earthquake in Eastern Afghanistan . This is really heartbreaking 💔. Prayers for our Afghan brothers and sisters. The world should come forward to help humanity. pic.twitter.com/GdP74aFhrK — Baba Banaras™ (@RealBababanaras) September 1, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…

उद्ध्वस्त भविष्याकडे टक लावलेली नजर

भूकंपानंतर रस्त्यांवर उभ्या असलेल्या मुलांच्या डोळ्यांत भीती, तर वडिलधाऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसते. घरं, शाळा, मशिदी कोसळल्या आहेत. हजारो लोकांनी आयुष्यभराचा संसार गमावला आहे. प्रत्येक कुटुंबात एखादा मृत, एखादा जखमी. या भीषण दृश्यांनी अफगाणिस्तान पुन्हा एकदा जखमी झाला आहे. मानवतेसमोरचा प्रश्न आता एवढाच आहे या भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना जग कसा आधार देईल?

Web Title: Afghanistan earthquake 622 people lose lives 4 videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Afganistan
  • Afghanistan Earthquake
  • Earthquake
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर; आता काय करणार ट्रम्प?
1

US Iran War : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर; आता काय करणार ट्रम्प?

आता हवेतच होणार जंगी युद्ध? आज पृथ्वीवर येणार 600kg चे संकट! NASA ने केली हादरवणारी भविष्यवाणी
2

आता हवेतच होणार जंगी युद्ध? आज पृथ्वीवर येणार 600kg चे संकट! NASA ने केली हादरवणारी भविष्यवाणी

Global Oil Politics : पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत
3

Global Oil Politics : पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत

World War 3 : इराण युद्धादरम्यान जपानचा मोठा डाव! चीनच्या सीमेजवळ धाडली खतरनाक क्षेपणास्त्रे; ड्रॅगन संतापणार?
4

World War 3 : इराण युद्धादरम्यान जपानचा मोठा डाव! चीनच्या सीमेजवळ धाडली खतरनाक क्षेपणास्त्रे; ड्रॅगन संतापणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.