Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी

मालकच्या उदारतेने संपूर्ण जगाला थक्क केलं! कंपनी विक्रीचा नफा स्वतःकडे नाही, कर्मचाऱ्यांकडे... अमेरिकेतील लुईझियाना येथील ‘फायबरबॉन्ड’ कंपनीच्या सीईओने कंपनी विकून यातील मोठा नफा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 03:33 PM
असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी

असा मालक मिळायला तर नशीबच लागेल! कंपनी विकून मालकाने 540 कर्मचाऱ्यांना वाटले तब्बल 2000 कोटी

Follow Us
Close
Follow Us:
  • कंपनी विक्रीतून मिळालेल्या सुमारे २,००० कोटी रुपयांचा बोनस कर्मचाऱ्यांना वाटण्यात आला.
  • प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला सरासरी ३.७ कोटी रुपये, जरी त्यांच्याकडे शेअर्स नव्हते तरीही.
  • या निर्णयामुळे अनेकांनी घरकर्ज फेडले, व्यवसाय सुरू केले आणि भविष्य सुरक्षित केले.
अमेरिकेतील लुईझियाना येथील बातमीने कंपनीचा मालक आणि कर्मचारी यांच्यातील नात्याची एक नवी व्याख्या तयार केली आहे. येथील ‘फायबरबॉन्ड’ या फॅमिली बिझनेसचे सीईओ ग्राहम वॉकर यांनी कंपनी विकल्यानंतर जे पाऊल उचलले, ते पाहून प्रत्येकजण म्हणतोय-“असा मालक सर्वांना मिळो !

वॉकर यांनी कंपनीच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा एक मोठा हिस्सा, म्हणजेच सुमारे २,००० कोटी रुपये, आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावावर केले. जेव्हा कर्मचाऱ्यांना या बोनसची माहिती मिळाली, तेव्हा अनेकांचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसला नाही. सरासरी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला सुमारे ३.७ कोटी रुपये (४ लाख ४३ हजार डॉलर्स) आले आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांकडे कंपनीची कोणतीही मालकी किंवा शेअर्स नव्हते, तरीही त्यांना केवळ त्यांच्या निष्ठेचे बक्षीस म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे. फायबरबॉन्डचे हे यश सोपे नव्हते.

H-1B Alert: अमेरिकेकडून H-1B व्हिसा प्रक्रियेत ‘ही’ तपासणी अनिवार्य; तर, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला

कोणी फेडले कर्ज, तर कोणी खरेदी केले घर

या निर्णयामुळे रातोरात शेकडो कुटुंबांचे नशीब बदलले आहे. कंपनीत १९९५ पासून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची कथा अत्यंत भावूक करणारी आहे. जेव्हा त्यांनी नोकरी सुरू केली होती, तेव्हा त्यांचा पगार तासाला फक्त ५ डॉलर्स होता. या बोनसमुळे त्यांनी आपल्या घराचे कर्ज फेडले, याशिवाय स्वतः चे कपड्यांचे बुटीकही सुरू केले. अनेक कर्मचारी जे फक्त महिन्याच्या पगारावर जगत होते, ते आता सुरक्षित भविष्याचे नियोजन करत आहेत. कोणी मुलांची कॉलेज फी भरली, कोणी रिटायरमेंट फंड मजबूत केला, तर कोणी स्वप्नातील कार खरेदी केली. जेव्हा ग्राहम वॉकर यांना विचारले गेले की ‘लोक पैसे खर्च करत आहेत’, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर मन जिंकणारे होते, तो त्यांचा पैसा आहे, त्यांनी तो कसाही वापरावा.

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

कंपनी विकण्यापूर्वी ठेवली होती खास अट

फायबरबॉन्ड कंपनी अमेरिकेतील दिग्गज कंपनी ‘ईटन’ने खरेदी केली आहे. मात्र, हा सौदा करताना ग्राहम वॉकर यांनी एक स्पष्ट आणि कडक अट ठेवली होती. ज्या लोकांनी कंपनीला शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले रक्त आटवले, त्यांना या विक्रीच्या रकमेचा फायदा मिळालाच पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. वॉकर यांच्या मते, हा निर्णय त्या लोकांसाठी घेतला आहे जे कंपनीच्या कठीण काळातही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, ही संपूर्ण रक्कम एकाच वेळी दिली जाणार नसून, पुढील ५ वर्षात हप्त्यांच्या स्वरूपात दिली जाईल (अट अशी की त्यांनी कंपनीशी जोडलेले राहावे). जून २०२५ पासून या बोनसचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवातही झाली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: After selling the company the owner distributed a whopping rs 2000 crore to 540 employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • America
  • MONEY
  • World news

संबंधित बातम्या

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा
1

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
2

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

H-1B Alert: अमेरिकेकडून H-1B व्हिसा प्रक्रियेत ‘ही’ तपासणी अनिवार्य; तर, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला
3

H-1B Alert: अमेरिकेकडून H-1B व्हिसा प्रक्रियेत ‘ही’ तपासणी अनिवार्य; तर, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा
4

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.