Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO

Kamchatka Volcano Eruption : रशियामध्ये शक्तिशाली भूकंपानंतर आता ज्वालामुखीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामचटका प्रदेशातील ज्वालामुखीतून राखेचे ढग बाहेर पडत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 03, 2025 | 03:01 PM
After the earthquake now a volcanic eruption in Russia's Kamchatka

After the earthquake now a volcanic eruption in Russia's Kamchatka

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियामध्ये भूकंपानंतर आता ज्वालामुखीचे संकट उभे राहिले आहे.
  • रशियाच्या कामचटका प्रदेशातमध्ये क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.
  • कामचटका द्वीपकल्पावर धोका आणखी वाढण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Russia News marathi : मॉस्को :  रशियामध्ये शक्तिशाली भूकंपानंतर (Earthquake) आता आणकी एक मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या आठवड्यात रशियाच्या कमचटका प्रदेशात ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूंकपाचे झटके जाणवले होते. आता या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेक सुरु झाला आहे. यामुळे आपत्कालीन विभागाने रविवारी लोकांना सतर्कतेचा इशारा जारी केली आहे. पण यामुळे कामचटका प्रदेशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्हिडिओ व्हायरल

सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कामचटका प्रदेशातील क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीतून राखेचे ढग बाहेर पडताना दिसत आहेत. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या ग्लोबल कार्यक्रमानुसार यापूर्वी या ज्वालामुखीचा १५५० मध्ये उद्रेक झाला होता. आता ६०० वर्षानंतर पुन्हा या ज्वालामुखाचा उद्रेक होत आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या भूंकंपामुळे हा उद्रेक होत असण्याची शक्यता आहे. या भूकंपामुळे गेल्या आठवड्यात रशिया, जपानसह अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये त्सुनामीचा फटका बसला होता. यामुळे सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयेने, कामचटका द्वीपकल्पावरील स्फोटानंतर ऑरेंज अलर्ट जारी केला होता. विमानांना वाढत्या धोक्याचे संकेत देण्यात आले होते.

Russia Earthquake : जमीन हादरली, वस्तू पडल्या… क्षणार्धात झालं नष्ट ; रशियाचा भूकंपाचा अंगावर काटा आणणारा VIDEO

लोकांना न घाबारण्याचे आवाहन 

रशियाच्या (Russia) सरकारी माझ्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ज्वालामुखीतून निघणारे राखेचे ढग पूर्वेकडे प्रशांत महासागराच्या दिशेने जात आहे. या भागात कोणतीही लोकसंख्या नाही यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच लोकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन सेवांच्या संपर्कात राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. परंतु गेल्या आठवड्यातील भूकंपानंतर शास्त्रज्ञांनी आफ्टरशॉकचा इशारा जारी केला आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आले आहे.

New video shows absolutely stunning footage of Krasheninnikov erupting after 600 years.

On August 2, 2025, it recorded its first-ever eruption, with ash soaring up to 5-6 km high. Scientists believe it may be linked to the recent M8.8 earthquake.

📍 Kamchatka, Russia. pic.twitter.com/1CKiSXbeRM

— Weather Monitor (@WeatherMonitors) August 3, 2025

FAQs ( संबंधित प्रश्न)

रशियामध्ये सतत भूकंप का होतात?

रशिया टेक्टोनिक प्लेस्टच्या कडांवर वसलेला आहे. तसेच याचा पूर्व पॅसिफिक भाग हा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. यामुळे या प्रदेशात भूकंपाचे, ज्वालामुखीचे उद्रेक सतत होत असतात. यासाठी टोक्टोनिक क्रियाकलाप कारणीभूत ठरतात.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.

Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा गूढ मृत्यू ; प्रकरणाची सखोल चौकशी सुरु

Web Title: After the earthquake now a volcanic eruption in russias kamchatka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Earthquake
  • Russia
  • Russia Earthquake

संबंधित बातम्या

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
1

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत
2

VIDEO: रेड कार्पेट, आकाशात गरजणारे B-2 बॉम्बर्स आणि फायटर जेट… ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?
3

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
4

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.