
gaza rain and flood
इस्रायलचा मोठा प्रहार! हमासचा कुख्यात कमांडर राद सादचा खात्मा, कारवाईचा VIDEO आला समोर
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे गाझामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रस्त्यांवर प्रचंड पाणी साचले असून लोकांचे टेंट पाण्याखाली गेले आहेत. सर्व अन्न, कपडे, जीवनावश्यक सामान भिजले आहे. अनेक भागांमध्ये कच्च्या रस्त्यांमुळे चिखल निर्माण झाला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. तसेच पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याचे ढिग आणि सांडपाणे धबधब्यासारखे वाहत आहे. यामुळे भीषण रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे.
युद्धविरामानंतर गाझामध्ये पुरेसा मदतसाठी पोहोचलेला नाही. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, दररोज ६०० ट्रक मदत साहित्य पाठवण्याचे ठरले आहे, परंतु हमासने युद्धबंदीच्या अटी पूर्ण न केल्याने हे सामान अडकून पडले आहे. शिवाय मदत संस्थांनी देखील साहित्य पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाझातील पूरस्थिती आणि चिखलामुळे अनेक ट्रक आडकले आहेत.
थंडी, गर्दी आणि अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे रोग आणि संसर्गाचा धोका वाढला आहे. मानवतावादी मदत पोहोचवणे कठीण झाले आहे. सर्वाधिक फटका खान युनूस शहराला बसला आहे. खान युनूसमधील टेंट कॅम्पमधील लोकांचे, अन्न, कडपे, गाद्या वाहून गेल्या आहेत. अनेक कुटुंबांना संपूर्ण रात्र ओल्या टेंटमध्ये घालवावी लागली आहे.
मदत संस्था आणि संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे मदतकार्य ठप्प झाल आहे. खराब हवामान, खराब रस्ते यामुळे सामग्री पोहोचवण्यात अडथला येत आहे. संयुक्त राष्ट्रांची संस्था UNRWA ने इशारा दिला आहे की, या परिस्थितीमुळे सध्या गाझात थंडी, पूर, अस्वच्छता, गर्दीची परिस्थितीमुळे आजार आणि संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम गाझातील लहान मुलांवर, महिलांवर होत आहे. गाझातील एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, एक आठ वर्षाचा मुलगा रात्रभर थंडीत आणि ओल्या पाण्यात राहिल्याने बधिर झाला आहे. युद्धामुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या गाझावासीयांच्या आयुष्यात आता पाऊस आणि पूर अधिक वेदनादायी बनत आहेत.
Ans: इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आधीच गाझाचे नुकसान झाले आहे, अशातच मुसळधार पावसाने आपला कहर सुरु केला आहे. थंडी, पूर यामुळे लोकांचे तात्पुतरेच टेंट पाण्याखाली गेले असून अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ans: गाझातील पावसाचा सर्वाधिक फटका हा विस्थापित कुटुंबे, लहना मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना बसला आहे. अनेकजणांचे टेंट पाण्याखाली गेले असून अन्न, कपडे सर्व काही ओलसर झाले आहे.
Ans: सध्या गाझात भयंकर परिस्थिती असून खराब हवामान, चिखलात गेलेले रस्ते, पुर यांमुळे मदतवाहने अडकली आहे. ज्यामुळे गाझातील लोकांपर्यंत मदत सामग्री पोहोचवणे कठीण जात आहे.
Ans: संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, सध्या गाझात मुसळधार पाऊस, पूर, थंडी, अस्वच्छता यामुळे रोगराईचा संसर्ग वाढत आहे. शिवाय मानवतावादी मदत पोहोचवणे गरजेचे आहे.