भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचतली. १७ फेब्रुवारी रोजी ते लोकभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) ची भेट घेणार आहेत. यावेळी भारत आणि फ्रान्समधील सामजस्यं कारावर स्वाक्षरी केली जाईल. यांनतर एक संयुक्त निवेदन जारी करुन जगासमोर दोन्ही देशांच्या समन्वय सादर केला जाईल.
या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्येही उपस्थित राहणार आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते भेट देतील. ही भेट दोन्ही देशांतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक संबंधाचे महत्वाचे प्रतीक आहे.
याशिवाय १८ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन नवी दिल्लीत आयोजित AI इम्पॅक्ट समिटमध्येही सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सामावेशक विकास, जागतिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर आधारित चर्चा केली जाणार आहे. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन आपल्या कुटुंबासोत फॅमिलि फोटोसेशनमध्ये सहभागी होतील.
या भेटीत भारत-फ्रान्स हॉरिझॉन २०४७ रोडमॅप अंतर्गत विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इंडो-पॅसिफिख क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेवरी चर्चा केली जाईल. एआयच्या क्षेत्रात दोन्ही देशात वाढते सहकार्य अधिक मजबूत होण्याची, सेवा अधिक जलद आणि प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या भेटीमुळे भारत आणि फ्रान्सचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
Ans: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानताळवर पोहोचतील यांनतर ते १९ फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर असणार आहेत.
Ans: इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा भारत दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्सच्या द्विपक्षीय संबंधांना चालना मिळणार आहे.






