
AI robot gets admission for PhD programme in China
आता चीनने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जगात पहिल्यांदाच एक एआय रोबोट पीएचडीचा अभ्यास करणार आहे. या रोबोटला चीनने प्रवेशही दिला आहे. या ह्यूमनॉईड रोबोटचे Xueba 01 असे नाव ठेवण्यात आले आहे. येत्या चार वर्षांसाठी या Xueba 01 रोबोटला पीएचडीसाठी शांघाय सुनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश मिळाला आहे. या संस्थेचा हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. चीनी ओपेरा विषयांवर संशोधन Xueba 01 रोबोट करणार आहे.
रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO
Xueba 01 हा एक मानवासारखा दिसणारा ह्यूमनॉईड रोबोट आहे. याची त्वचा सलिकॉनने बनवण्यात आली आहे. तसेच याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील मानवाप्रमाणेच आहेत. या रोबोटचे वजन ३० किलो आणि उंची १.७५ मीटर आहे. हा रोबोट चालतो, बोलतो, प्रश्नांची उत्तरे देतो अगदी एखाद्या संशोधकासारखे काम करतो.
सप्टेंबर २०२५ मध्ये Xueba 01 चे पीएचडीसाठी अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे. इतर मानवी विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यास करणार आहे, संशोधन करणार आहे आणि त्याचे प्रेझेंटेशन देखील करणार आहे. चीनच्या या उपक्रमाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही एक भविष्याची नवी सुरु वात आहे, परंतु यामुळे शिक्षण क्षेत्रामद्ये मानव मागे पडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. AI मुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत, पण याचे परिणामदेखील तितकेच गंभीर असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये AI सध्या विदयार्थ्यांच्या मदतीस येत आहे, मात्र यामुळे बरेच विद्यार्थी यावर अवलंबून झाले आहे, यामुळे त्यांच्यामधील कौशल्य कमी पडत चालले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि मानवी बुद्धिमत्तेचा एक नवा अध्याय ठरु शकतो, पण यामुळे काही वाईट परिणाम देखील मानवाला भोगावी लागणार आहेत.
‘त्या’ चौघांवर काळाचा घाला! अमेरिकेत चार भारतीय वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू ; घटनेचा तपास सुरु