Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शासन यंत्रणेत AI चा वापर वाढवून सक्षम…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

अलीकडेच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ब्राझीलच्या मंत्र्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या (DPI) अनुभवाच्या आधारे स्वतःची प्रणाली विकसित करत असल्याचे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 07:42 PM
“शासन यंत्रणेत AI चा वापर वाढवून सक्षम…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
Follow Us
Follow Us:

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व
कृषी क्षेत्रात ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ आणि ‘महाविस्तार’ या ‘एआय’चा वापर
धोरणनिर्मितीत उद्योगांचा सहभाग

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम 2026 च्या चर्चासत्रात पत्रकार विष्णु सोम यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त केले. या चर्चासत्रात मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अध्यक्ष सिंधू गंगाधरन आणि पीडब्ल्यूसीचे अध्यक्ष संजीव कृष्णन यांचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासन यंत्रणेत एआयचा वापर वाढवून सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यामध्ये समन्वय वाढवून एआय-सक्षम मनुष्यबळ तयार करण्यावर शासन काम करत आहे. यासाठी मुंबईत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलत आहे आणि शिक्षण प्रणालीने त्यानुसार करावयाचे बदल यावर विचारमंथन होईल. शासन, शिक्षण संस्था आणि नॅसकॉमसारख्या उद्योग संघटनांनी एकत्रितपणे काम केल्यास ‘एआय’ क्षेत्रात महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

🔸CM Devendra Fadnavis at the 'Nasscom Technology and Leadership Forum 2026'.
Sindhu Gangadharan, Chairperson, Nasscom, Sanjeev Krishan, Chairman, PwC India and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026' येथे… pic.twitter.com/cm1dGeMFqA — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 24, 2026

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अलीकडेच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत ब्राझीलच्या मंत्र्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या (DPI) अनुभवाच्या आधारे स्वतःची प्रणाली विकसित करत असल्याचे सांगितले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत सध्या जागतिक नेतृत्व करत आहे.

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

कृषी क्षेत्रात ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ आणि ‘महाविस्तार’ या ‘एआय’चा वापर

राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या ‘एआय’ 4ॲग्री समिट’चा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ॲग्रीस्टॅक’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची जमीनधारणा, पिकांची माहिती आणि इतर तपशील एकत्रित केले जात आहेत. त्याचबरोबर ‘महाविस्तार’ या एआय अ‍ॅपद्वारे जनरेटिव्ह एआयचा वापर करून प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला वैयक्तिक डिजिटल सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या 30 लाख शेतकरी या प्लॅटफॉर्मवर जोडले गेले आहेत. ‘अँग्रीस्टॅक’ आणि ‘महाविस्तार’ यांचा संगम शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च 25 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यास आणि शेतीतील अनिश्चितता कमी करण्यास नक्की मदत करेल.

Web Title: Cm devendra fadnavis said agriculture nasscom technology and leadership forum artificial intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • DCM Devendra Fadnavis
  • Farmers
  • Farming

संबंधित बातम्या

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
1

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
2

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
4

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.