Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War 2026: तेहरानमध्ये स्मशान शांतता! खामेनींचा मृतदेह सापडला; इस्रायली हल्ल्यात ‘हे’ मुख्य 7 सर्वोच्च अधिकारीही संपले

Iran-Israel War हिंसक संघर्षात बदलली आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. इराणी माध्यमांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इस्रायली हल्ल्यांनी अनेक शहरांना लक्ष्य केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 09:39 AM
ali khamenei death confirmed 7 iranian generals killed israel airstrike tehran

ali khamenei death confirmed 7 iranian generals killed israel airstrike tehran

Follow Us
Follow Us:
  • इराणचे नेतृत्व संपले
  • ७ दिग्गज अधिकारी ठार
  • इस्रायलची मोठी कारवाई

List of Iranian generals killed by Israel 2026: मध्यपूर्वेतील युद्धाने आता अशा वळणावर प्रवेश केला आहे, (Iran-Israel War 2026) जिथून इराणचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. गेल्या काही तासांत झालेल्या इस्रायली हवाई दलाच्या भीषण हल्ल्यांनी इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाची धूळधाण उडवली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे, ३५ वर्षांहून अधिक काळ इराणवर राज्य करणारे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ( Ayatollah Ali Khamenei) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, संपूर्ण देश हादरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सर्वप्रथम हा दावा केला होता, ज्यावर आता अधिकृत मोहोर उमटली आहे.

इस्रायलचा ‘सर्जिकल’ प्रहार: ७ दिग्गज अधिकाऱ्यांचा अंत

इस्रायली लष्कराने (IDF) तेहरानमधील ज्या लष्करी तळांना लक्ष्य केले, तिथे इराणच्या संरक्षण व्यवस्थेचा ‘मेंदू’ मानले जाणारे ७ वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या एकाच हल्ल्यात इराणचे संपूर्ण लष्करी नियोजन कोलमडले आहे. मारल्या गेलेल्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

१. अझीझ नासिरजादेह: इराणचे विद्यमान संरक्षण मंत्री.

२. मोहम्मद पाकपौर: IRGC चे शक्तिशाली कमांडर-इन-चीफ.

३. अली शामखानी: खामेनींचे सर्वात विश्वासू सल्लागार आणि धोरणकर्ते.

४. मोहम्मद शिराजी: सर्वोच्च नेत्याच्या लष्करी ब्युरोचे मुख्य रणनीतिकार.

५. सालेह असादी: इराणच्या गुप्तचर यंत्रणेचे मुख्य सूत्रधार.

६. हुसेन जबल अमेलियन: SPND चे अध्यक्ष.

७. रेझा मुझफ्फरी-निया: अणु कार्यक्रमाचे मुख्य रणनीतिकार.

इस्रायली लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “आमच्या लढाऊ विमानांनी अचूक लष्करी लक्ष्यांवर प्रहार केला. या सात गुन्हेगारांच्या मृत्यूनंतर आता जग अधिक चांगले आणि शांत होईल.”

🔴ELIMINATED:
IAF fighter jets precisely struck military targets across Iran, eliminating 7 senior officials of the Iranian Defense Leadership:
Ali Shamkhani, Mohammad Pakpour, Saleh Asadi, Mohammad Shirazi, Aziz Nasirzadeh, Hossein Jabal Amelian, Reza Mozaffari-Nia#isreal pic.twitter.com/kCUrwMD8rt
— DAINIK NATIONAL NEWS DIGITAL MEDIA (@NATIONALNEWSDM) March 1, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East War: इराणने एकाच वेळी केला 8 देशांवर प्रहार! US लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; अबू धाबी, रियाधमध्ये भीषण स्फोट

तेहरानमध्ये रक्ताचा सडा आणि सत्तेचा पेच

इस्रायली मीडिया आउटलेट ‘विनीत’ (Ynet) नुसार, सीबीएस गुप्तचर सूत्रांनी असा दावा केला आहे की या हल्ल्यात केवळ हे ७ नव्हे, तर सुमारे ४० वरिष्ठ इराणी अधिकारी मारले गेले असावेत. तेहरानमधील अनेक सरकारी इमारती आणि लष्करी छावण्या आता ढिगाऱ्यात रूपांतरित झाल्या आहेत. खामेनींच्या मृत्यूनंतर आता इराणचा नवा सर्वोच्च नेता कोण असेल? मोज्तबा खामेनी की एखादी लष्करी समिती? यावरून आता अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran’s New War Machine: खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वात ‘कट्टर’ जनरल मैदानात; अहमद वाहिदी बनले IRGC चे नवे प्रमुख

जगावर युद्धाचे सावट

अमेरिकेच्या पाठिंब्याने केलेल्या या कारवाईमुळे इराणमधील ‘इस्लामिक रिपब्लिक’ राजवट कोसळण्याच्या मार्गावर आहे. ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इराणने अण्वस्त्रे मिळवू नयेत आणि त्यांची दहशतवादी कृत्ये थांबावीत, हेच या युद्धाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुसरीकडे, इराणमधील रिव्होल्यूशनरी गार्ड्स आता बदला घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण मध्यपूर्व आगीच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची खात्री झाली आहे का?

    Ans: होय, सुरुवातीला अमेरिकेने दावा केल्यानंतर आता इराणी माध्यमांनीही सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे.

  • Que: इस्रायली हल्ल्यात कोणकोणते मोठे अधिकारी मारले गेले?

    Ans: या हल्ल्यात संरक्षण मंत्री अझीझ नासिरजादेह, IRGC कमांडर मोहम्मद पाकपौर आणि अणु रणनीतिकार रेझा मुझफ्फरी-निया यांच्यासह ७ उच्चपदस्थ अधिकारी मारले गेले.

  • Que: इस्रायलने या हत्येचे काय समर्थन केले आहे?

    Ans: इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, हे अधिकारी जागतिक शांततेसाठी धोका होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर जग अधिक सुरक्षित होईल.

Web Title: Ali khamenei death confirmed 7 iranian generals killed israel airstrike tehran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Israel Iran war
  • World War 3

संबंधित बातम्या

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ
1

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?
2

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?
3

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड
4

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.