Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या न्यायालयाने  ICE अधिकाऱ्यांना झापलं; ५ वर्षांच्या चिमुरडा आणि वडिलांच्या सुटकेचे दिले आदेश, ट्रम्पला झटका

US Immigration family detaintion : ट्रम्प प्रशासनाला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने इमिग्रेशन अधिऱ्यांना 5 वर्षाच्या लियाम आणि त्याच्या वडिलांना डिटेंशन सेंटरमधून सोडण्याचे आदेश दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 09:29 AM
US Immigration Policy

US Immigration Policy

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या न्यायालयाचा मोठा निर्णय
  • ICE अधिकाऱ्यांना ५ वर्षाच्या लियामला सोडण्याचे दिले आदेश
  • वडिलांनाही डिटेन्शन सेंटरमधून सोडण्याचे आदेश
US Immigration : वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. यामुळे ट्रम्प प्रशासानाला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने ५ वर्षाचा चिमुकला लियाम कोनेजो रामोसा आणि त्याचे वडि एड्रियन कोनेजो एरियस यांना टेक्सासच्या डिटेंशन सेंटरमधून सोडण्याच्या निर्णय दिले आहे. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाच्या इमिग्रेशन (Immigration) धोरणासाठी हा मोठा धक्का मानला जात आहेत.

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?

काय आहे प्रकरण?

23 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने मिनेसोटायेथील मिनियापोलिस येथून  लियाम रामोसा या 5 वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले होते.  या चिमुरड्याला त्याच्याआईला घराबाहेर काढण्यासाठी आणि इतर सदस्यांना पकडण्यासाठी ताब्यात घेतले असा दावा स्थानिक सरकार आणि शाळांकडून करण्यात आला होता. यानंतर त्या चिमुरड्याला आणि त्याच्या वडिलांना टेक्सासच्या डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.

रामोसा कुटुंबाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अमेरिकेत लियाम आणि त्याचे वडील २०२४ मध्ये अधिकृत मार्गाने अमेरिकेत आले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ‘डिपोर्टेशन ऑर्डर’ (देशातून बाहेर काढण्याचा आदेश) नव्हता. त्यांचा निर्वासित होण्यासाठीचा अर्ज (Asylum claim) न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तरीही त्यांना अटक करुन डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले होते. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर स्थानिक लोकांनी आणि अनेक मानवाधिकार संघटनांनी याला तीव्र विरोध केला होता.

फेडरल न्यायालयाने लियामच्या डिटेंशनवर काय म्हटले?

दरम्यान लियामच्या प्रकरणावर अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाचे डिस्ट्रिक न्यायाधीश फ्रेड बियारी यांनी तीव्र टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रोजचा डिटेंशन कोटा पूर्ण करण्यासाठी आता चिमुकल्या मुलांनाही त्रास दिला जात आहे. त्यांनी म्हटले की, न्यायालयाने स्पष्ट केले होते की, लियाम आणि त्याच्या वडिलांना देशाबाहेर पाठवता येणार नाही. तसेच न्यायालयाने त्यांना सोडण्याचे आदेशही दिले आहेत.

मिनियापोलिसमध्ये निदर्शने

अमेरिकेत गेल्या काही काळापासून इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. मिनियापोलिसमध्ये गेल्या काही दिवसात अनेक घटनांमध्ये ICE अधिकाऱ्यांच्या कारवाईत लोकांचा मृत्यू झाला आहे. लोक जखमी झाले आहेत. तसेच गोरदोर महिलेलाही जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर स्पष्टीकरण देताना अधिकाऱ्यांनी हा ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन कारवाईचा भाग असल्याचे म्हटले आहे. तर ट्रम्प प्रशासनाने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेल्या नाही.

यामुळे सध्या अमेरिकेतील नागरिकांचा संताप वाढत असून अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईविरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत 5 वर्षाच्या लियाम रामोस आणि त्याच्या वडिलांना का अटक करम्यात आली होती?

    Ans: अमेरिकेत 5 वर्षाच्या लियाम रामोस आणि त्याच्या वडिलांना इमिग्रेशन कारवाई अंतर्गत अटक करण्यात आली होती.

  • Que: अमेरिकेत 5 वर्षाच्या लियाम रामोस आणि त्याच्या वडिलांच्या अटकेवर अमेरिकेच्या न्यायालयाने का निर्णय दिला?

    Ans: अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने अमेरिकेत 5 वर्षाच्या लियाम रामोस आणि त्याच्या वडिलांच्या सुटकेचे आदेश ICE अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • Que: न्यायालयाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर काय आरोप केले आहेत?

    Ans: अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाच्या मते, इमिग्रेशन अधिकारी रोजचा डिटेंशन कोटा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांना देखील ताब्यात घेत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: America federal judge orders ice to release of 5 year old liam ramos his father from detention us immigration policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
1

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
2

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद
3

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ
4

Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.