'एक ५ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी परतत होता...' ट्रम्प अधिकाऱ्यांनी त्याला घेऊन गेले आणि हे प्रकरण सार्वजनिक झाले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Liam Conejo Ramos ICE detention Minnesota : अमेरिकेतील ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाच्या नव्या इमिग्रेशन धोरणाने आता क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. मिनेसोटा राज्यातील कोलंबिया हाईट्समध्ये ५ वर्षांचा निष्पाप बालक ‘लियाम रामोस’ याला त्याच्या वडिलांसह फेडरल एजंटांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चिमुरड्याला त्याच्याच आईला घराबाहेर काढण्यासाठी आणि इतर सदस्यांना पकडण्यासाठी ‘आमिष’ म्हणून वापरण्यात आल्याचा धक्कादायक दावा स्थानिक शाळा अधिक्षकांनी केला आहे.
मंगळवारी दुपारी जेव्हा लियाम आपल्या प्रीस्कूलमधून घरी परतला, तेव्हा मुखवटा घातलेल्या सशस्त्र ICE एजंटांनी त्याच्या घराच्या ड्राईव्हवेमध्येच त्याला आणि त्याच्या वडिलांना अडवले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, निळा केप घातलेला आणि खांद्यावर स्पायडर-मॅनचा बॅकपॅक असलेला लहानगा लियाम कमालीच्या भीतीत उभा आहे. शाळा अधिक्षक जेना स्टॅनविक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “एजंटांनी त्या ५ वर्षांच्या मुलाला चालू गाडीतून बाहेर काढले आणि त्याला घराचा दरवाजा ठोठावण्यास सांगितले, जेणेकरून घरात कोण आहे हे त्यांना कळू शकेल. हे एखाद्या लहान मुलाला आमिष म्हणून वापरण्यासारखेच आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : शांतीदूत की युद्धदूत? नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’; क्युबा-निकाराग्वा निशाण्यावर
रामोस कुटुंबाचे वकील मार्क प्रोकोश यांनी स्पष्ट केले की, लियाम आणि त्याचे वडील २०२४ मध्ये अधिकृत मार्गाने अमेरिकेत आले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ‘डिपोर्टेशन ऑर्डर’ (देशातून बाहेर काढण्याचा आदेश) नव्हता. त्यांचा निर्वासित होण्यासाठीचा अर्ज (Asylum claim) न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही त्यांना अटक करून १२०० मैल दूर टेक्सासमधील ‘डिली’ (Dilley) येथील डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
Enforcing the law is one thing. Terrorizing a population, using children as pawns, is another. My heart aches for Liam Ramos and his family.https://t.co/Y1pkUvBilT pic.twitter.com/TsppVxrX2e — Hillary Clinton (@HillaryClinton) January 22, 2026
credit – social media and Twitter
या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “लियाम रामोस हा केवळ एक लहान मुलगा आहे. तो आपल्या कुटुंबासोबत घरी असायला हवा होता, पण ICE ने त्याला टेक्सासच्या डिटेंशन सेंटरमध्ये आमिष दाखवून ठेवले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.” मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनीही या कारवाईला “सूडाची मोहीम” म्हणत तीव्र निषेध नोंदवला आहे.
Liam Ramos is just a baby. He should be at home with his family, not used as bait by ICE and held in a Texas detention center. I am outraged, and you should be too. pic.twitter.com/djr2z1AG0N — Kamala Harris (@KamalaHarris) January 22, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला
शाळेच्या अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, लियाम हा या शाळेतील चौथा विद्यार्थी आहे ज्याला गेल्या दोन आठवड्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये १७ वर्षांचे दोन आणि १० वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. “आमची मुले शाळेत येताना घाबरलेली आहेत. एजंट शाळेच्या बसेसचा पाठलाग करत आहेत आणि पार्किंग लॉटमध्ये फिरत आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
Ans: ट्रम्प प्रशासनाच्या नव्या इमिग्रेशन धोरणांतर्गत 'टार्गेटेड ऑपरेशन' दरम्यान लियाम आणि त्याच्या वडिलांना मिनेसोटातील त्यांच्या घराबाहेरून ताब्यात घेण्यात आले.
Ans: शाळा प्रशासनाचा असा आरोप आहे की, एजंटांनी लियामला घराचा दरवाजा ठोठावून घरातील इतर सदस्यांना (विशेषतः त्याच्या आईला) बाहेर काढण्यास प्रवृत्त केले.
Ans: कुटुंबाच्या वकिलांच्या मते, ते २०२४ मध्ये कायदेशीर मार्गाने आले असून त्यांचा निर्वासित अर्ज (Asylum) न्यायालयात प्रलंबित आहे.






