अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाच्या चिमुकलीही ताब्यात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका ५१ वर्षीय व्यक्तीवर गोळीबार केला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटेनेममुळे मिनियापोलिसच्या स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडे धोकादायक शस्त्रे आणि काडतुसे होती यामुळे गोळीबारा करण्याता आले असल्याचे म्हटले आहे. तसेच मिनियापोलिसच्या गव्हर्नरर टीम वॉल्झ यांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे.
इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडे धोकादायक शस्त्रे आणि काडतुसे होती यामुळे गोळीबार करण्याता आले असल्याचे म्हटले आहे. वॉल्झ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांनी व्हाइट हाउससोबत संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासानाच्या इमिग्रेशन धोरणाला दडपशाही म्हणून संबोधले आहेत. सध्या या घटनांमुळे मिनियापोलिसमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या वेळी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने आणखी एका व्यक्तीला त्याच्या २ वर्षाच्या चिमुकलीसह ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव एल्विस जोएल टिपॉन-एचेव्हेरिया असून तो आपल्या मुलीसोबत किराणा दुकानातून घरी परतत होता. यावेळी त्याला आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वडिल आणि मुलीली तात्काळ टेक्क्सासमधील डिटेन्शन कार्यालयात नेण्यात आले. काही तासानंतर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.
या घटनेच्या एक दिवस आधीच एका पाच वर्षीय चिमुकल्यालाही त्याच्या वडीलांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना टेक्सासमधील डिटेन्शन तुरुंगात पाठवण्यात आले होते. याशिवाय एका गरदोर महिलेला जमिनीवर दाबत जबरदस्तीने अटक करण्यात आली होती. सध्या या वाढत्या हिंसक घटनांमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे. लोक ट्रम्प प्रशासनाविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत.
अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO
Ans: मिनियापोलिसमध्ये संघीय अधिकाऱ्यांच्या इमिग्रेशन कारवाईदरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Ans: इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेकादेशीर स्थलांतरितांवरिोधात केलेल्या कारवाई व्यक्तीला ताब्यात घेतले होते, यामुळे त्याच्या २ वर्षाच्या मुलीलाही काही काळासाठी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.
Ans: इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईत लोकांचा बळी जात आहे, लहान मुलांना ताब्यात घेतले जात आहे. तसेच गर्भवती महिलेला जबदस्तीने अटक केली जात आहे. यामुळे लोकांनी ICE अधिकाऱ्यांच्या कारवाईला आणि ट्रम्प प्रशासानच्या धोरणाला तीव्र विरोध केला आहे. लोकांनि निदर्शने सुरु केली आहेत.






