america big snowstorms and tornadoes threat Possibility of huge damage 100 million people alert issued by national weather service
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेत गंभीर नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. काही भागांत हिमवादळ आणि चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. या वादळाचा प्रभाव 10 कोटीहून अधिक लोकांना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या मिसिसिपी, नॉर्थ प्लेन्स, टेक्सास आणि ओक्लाहोमा या भागांमध्ये टोर्नेडो चक्रीवादळ आणि हिमवादळाचा मोठा धोका असल्याे सांगण्यात आले आहे. यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
नॅशनल वेदर सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे 130 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात, तर काही भागांत हा वेग 160 किमी प्रति तासांपर्यंत पोहोचू शकतो. कॅनडा बॉर्डरपासून टेक्सासपर्यंत हे वारे तुफान वेगाने वाहण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारी (13 मार्च 2025) ला पूर्व लॉस एंजेलिसमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थितीचा धोका वाढला होता. शुक्रवारी (14 मार्च 2025) कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल कोस्टवरही जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले.
7:36pm CDT #SPC_Watch WW 36 TORNADO AR IL IN KY MO MS TN 150030Z – 150800Z, https://t.co/UJ3khsdSsZ pic.twitter.com/KFoX7tTuIO
— NWS Storm Prediction Center (@NWSSPC) March 15, 2025
स्टार्म प्रेडिक्शन सेंटरच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात मिसिसिपी, मिसिसिपी, केंटकी, टेनेसी, मिसूरी, इलिनॉय, आयोवा आणि अर्कान्सासच्या भागांमध्ये प्रचंड वाऱ्यासह टोर्नेडो चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात गारांचा फडकाही बसून शकतो. चक्रीवादळ आणि हिमवादळामुळे परिस्थिती प्रचंड गंभीर होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळ आणि हिमवादळाचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या बर्मिंघम, न्यू आर्लीन्स आणि अलाबामाच्या काही भांगांमध्ये बसण्याची शक्यता आहे. यामुळे अलाबामाच्या गव्हर्नर के आयवे यांनी अलाबामाच्या परिसरात आणीबाणीची घोषणा जाहीर केली आहे. स्टार्म प्रेडिक्शन सेंटरचे बिल बंटिंग यांनी म्हटले आहे की, या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांना मोठ्या हानीची शक्यता आहे.
उत्तर आणि दक्षिण डकोटो, तसेच मिनसोटामध्येही प्रचंड बर्फवृष्टीचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. ताशी 60 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शिवाय जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. गेल्या गुरुवारपासून एरिझोना आणि युटाहच्या डोंगराळ भागांत हिमवादळाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे I-40 महामार्गावर वाहतूकसुविधा बंद करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उष्ण हवामानामुळे टेक्सास, ओक्लाहोमा आणि आग्नेय कॅन्ससमध्ये जंगलांना मोठा आगीचा धोका निर्माण झाला आहे. ताशी 72 किमी प्रति वेगाने वारे वाहत असून, भीषण आग लागण्याची शक्यता आहे. टेक्सासमधील अर्ध्याहून अधिक काउंटींमध्ये आधीच आगीवर बंदी आहे.