Donald Trump Made A Big Proposal On Iran Nuclear Program In Riyadh
रियाध: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चार दिवसांच्या मध्यपूर्व देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पहिली भेट सौदी अरेबियाला दिली. या भेटीदरम्यान रियाधमध्ये अमेरिका आणि सौदी अरेबियात मोठा संरक्षण करार करम्यात आला. तसेच यादरम्यान ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा केली.
ट्रम्प यांनी इराणला अणुक्रार्यक्रम तातडीने बंद करण्याचा इशारा दिला. यासाठी अमेरिका करार करण्यास तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. परंतु त्यांनी इराणसमोर काही अटी ठेवल्या आहे. ट्रम्प यांनी इराण प्रॉक्सी गटांना प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले आणि इराणने हे लवरात लवकर थांबवावे असा इशाराही त्यांनी दिला.
सौदी अरेबियाच्या राजधानी रियाधमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्लफ कोऑपरेशम काउन्सिलच्या बैठकीत ट्रम्प यांनी इराणला संबोधित केले. ट्रम्प यांनी म्हटले की, इराणने दहशतवादाला समर्थन देणे बंद करावे, रक्तरंजित प्रॉक्सी युद्ध थांबवावे. तसेच अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्नही थांबववा असे ट्रम्प यांनी म्हटले.
Major Breakthroughs in the US–Saudi Alliance.
President Trump just reignited America’s relationship with Saudi Arabia, starting with a billion-dollar handshake in Riyadh.
But it’s what he told Iran that shocked the room.
You won’t believe what you’re about to hear.
A Thread🧵 pic.twitter.com/U6eE0OwF1P
— Karl Mehta (@karlmehta) May 14, 2025
गेल्या काही महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मध्यस्थीने इराणच्या अण्वस्त्र बनवण्याच्या कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही देशांत चार वेळा चर्चा झाली आहे. परंतु अमेरिकाला यामध्ये अपयश आले आहे. ट्रम्प यांनी अनेकवेळा इराणला अणुशस्त्र बनवणे थांबवण्यास सांगितले आहे, परंतु इराणने अद्याप अमेरिकेच्या कोणत्याही गोष्टीला सहमती दर्शवली नाही.
ट्रम्प यांनी इराणवर गाझातील हमास, बेलनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हुथींना पाठिंबा देते असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, ७ ऑक्टोबर २०२३ पासून इराणच्या पाठिंब्यामुळे गेल्या काही महिन्यात प्रॉक्स नेटवर्क जास्त धोकादायक बनले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या विधानाला कपटी म्हणून वर्ण केले आहे. परंतु त्यांनी ट्रम्प यांच्या आवाहनावर कोणतेही थेट भाष्य केलेले नाही. ट्रम्प यांना इराणला त्यांच्या अणुकार्यक्रमाबद्दल योग्य निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण काहीतरी घडणारच आहे. ट्रम्प यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा इशाराही इराणला दिलेला आहे. परंतु अद्याप इराणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.