Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

US-Saudi nuclear deal : मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 19, 2025 | 09:10 AM
Historic nuclear deal between America and Saudi Arabia, Trump took big steps for the Crown Prince, approved the sale of F-35

Historic nuclear deal between America and Saudi Arabia, Trump took big steps for the Crown Prince, approved the sale of F-35

Follow Us
Close
Follow Us:
  1. अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी.
  2. पाचव्या पिढीतील अत्याधुनिक अमेरिकन F-35 लढाऊ विमानांच्या विक्रीस अमेरिकेची मंजुरी.
  3. या करारामुळे अमेरिका-सौदी भागीदारी मजबूत होणार असून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक व संरक्षण सहकार्य वाढणार.

US-Saudi nuclear deal : अमेरिका (America) आणि सौदी अरेबियामधील(Saudi Arabia) दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांना नवा ऐतिहासिक टप्पा गाठत मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये एक महत्त्वपूर्ण बहुआयामी करार करण्यात आला. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान नागरी अणुऊर्जा सहकार्य आणि अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानांच्या विक्रीसह संरक्षण क्षेत्रातील मोठे निर्णय अंतिम करण्यात आले.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “नागरी अणुऊर्जा सहकार्यासाठीची ही संयुक्त घोषणा दोन्ही देशांमध्ये पुढील अनेक दशकांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या अणुऊर्जा भागीदारीचा कायदेशीर पाया ठरेल.” या करारानुसार सौदी अरेबियाला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञान, सुरक्षा मानके आणि प्रगत प्रणालींचे सहकार्य मिळणार आहे.

F-35 फायटर जेट विक्रीला मंजुरी : संरक्षण क्षेत्रात मोठी चाल

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील F-35 स्टेल्थ लढाऊ विमानांच्या विक्रीला मान्यता. हे विमाने जगातील सर्वात प्रगत आणि उच्च सुरक्षा क्षमता असलेले फायटर जेट मानले जातात. यासोबतच अमेरिकेकडून अंदाजे 300 प्रगत टँकांची विक्री करण्यासही मान्यता दिली गेली आहे. या संरक्षण पॅकेजमुळे सौदी अरेबियाचे संरक्षण सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार असून मध्य-पूर्वेतील सुरक्षा संतुलनावरही त्याचा प्रभाव पडणार आहे. संरक्षण करारांच्या या मोठ्या टप्प्यामुळे अमेरिकेच्या औद्योगिक क्षेत्रातही हजारो रोजगार निर्माण होतील, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

 अमेरिका–सौदी धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत

व्हाईट हाऊसच्या माहितीपत्रकानुसार, हा एक बहुआयामी करार असून त्यात नागरी अणुऊर्जा, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वाची खनिजे, पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक सामंजस्य करारामुळे सौदी अरेबियाला अमेरिकन एआय प्रणालींमध्ये प्रवेश मिळेल, तर दुसरीकडे अमेरिकन तंत्रज्ञानाची सुरक्षितता आणि बौद्धिक संपदा संरक्षित राहील. या बैठकीत ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, रियाधने जाहीर केलेली 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भविष्यात 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे अमेरिका–सौदी आर्थिक सहकार्याला नवा वेग मिळणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

80 वर्षांच्या सुरक्षा भागीदारीला नवी दिशा

अमेरिका आणि सौदी अरेबियामधील सुरक्षा सहकार्याला 80 वर्षांहून अधिक काळ झाला असून हा करार दोन्ही देशांमधील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. मध्य-पूर्वेतील सुरक्षा मजबुतीकरण, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका-सौदी अणु करारात काय आहे?

    Ans: नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी तंत्रज्ञान, सुरक्षा मानके आणि दीर्घकालीन सहकार्याची व्यवस्था.

  • Que: सौदीला F-35 विक्री का महत्त्वाची?

    Ans: ही पाचव्या पिढीतील सर्वात प्रगत स्टेल्थ विमाने असून सौदीचे संरक्षण सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार.

  • Que: या कराराचा अमेरिकेला काय फायदा?

    Ans: रोजगार वाढ, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि मध्य-पूर्वेतील धोरणात्मक प्रभाव अधिक मजबूत होणार.

Web Title: America saudi arabia strategic nuclear cooperation trump approves f35 sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • International Political news
  • Saudi Arabia
  • Saudi Crown Prince

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
3

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
4

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.