Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘ते अमेरिकेला घाबरतात…’ ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान
तर जगातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा साठा हा व्हेनेझुएलाकडे आहे. व्हेनेझुएलाच्या ओरिनोको बेल्ट मध्ये सर्वाधिक साठे आढळतात. यानंतर सौदी अरेबिया, रशिया, इराण या देशांचा समावेश होतो. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अडमिनिस्ट्रेशननुसार (EIA), व्हेनेझुएलाकडे ३०३ अब्ज बॅरल कच्चा तेलाचा साठा आहे, जो जगातील एकूण साठ्याचा सुमारे पाचवा भाग आहे. ओरिनोको बेल्ट भागात सुमारे ५५,००० चौरस किमी क्षेत्राता हा साठा पसरलेला आहे. व्हेनेझुएलातील पेट्रोची किंमत ही ३.१५ रुपये असून, या किमतीत ३ लिटर पेट्रोल मिळते.
व्हेनेझुएलाचे तेल हे केवळ एक द्रव नसून ते पेट्रोल डिझेल तयार करण्यासाठी वापरता येते. व्हेनेझुएलाचे कच्चे तेल हे जास्त सल्फर असल्याने जाड आणि गाढं असते. यामुळे याच्या शुद्धीकरणासाठी हेवी रिफाइनरीजची गरज भासते. याची प्रक्रिया अधिक महाग आणि गुंतागुंतीची असते. म्हणूनच देशातील प्रत्येक रिफायनरीच सर्व प्रकारचे तेल शुद्धीकरण करु शकत नाही.
जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी या अमेरिकेच्या गल्फ कोस्टमध्ये आहेत. या रिफायनरी खास करुन व्हेनेझुएलातील जाड कच्च्या तेलावर प्रक्रियेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. यातील ७० टक्के रिफायनरीज या कच्चा तेलाच्या शुद्धीकरणासाठी अनुकूल आहेत. शिवाय अमेरिकेकडे असलेले शेल बूम हे हलके क्रूड ऑइल आहे, जे प्रत्येक रिफायनरीसाठी अनुकूल नाही. यामुळे अमेरिकेकडे आधीच जगातील सर्वात मोठ्या तेलाचा साठा असतानाही व्हेनेझुएलाचे तेल अधिक महत्त्वाचे आहे.
परंतु व्हेनेझुएलाचे तेल अधिक जवळ असल्याने याचा युद्ध किंवा सागरी तणावाच्या परिस्थिती महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. यासाठी अत्यंत कमी वेळ आणि कमी खर्च अमेरिकेला लागेल. यामुळे अमेरिकेच्या पायाभूत उर्जा सुविधांनी देखील मोठी मदत होईल. ज्यामुळे अमेरिकेचा जागतिक स्तरावर तेल बाजारात मोठा प्रभाव वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. यामुळेच जगातील अनेक महासत्ता देश देखील व्हेनेझुएलातील तेलावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हेनेझुएलाकडून भारत, चीन, रशिया, सिंगापूर, व्हिएनाम, आणि क्युबा हे देश तेल खरेदी करतात. यामध्ये भारताने २०२४ मध्ये सुमारे २.५४ लाख बॅरल तेल खरेदी केले होते. जे जवळपास एकूण निर्यातीच्या अर्धे आहे. चीन निर्यातीच्या सुमारे ५५ ते ८०% तेल व्हेनेझुएलातून आयात करतो म्हणजे रोज ७,४६,००० बॅरल.
अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर कठो निर्भंध लादले आहेत. ज्यामुळे जागतिक तेल बाजारपेठांमद्ये डिझेल, इंधनांच्या उत्पादनांवर, त्याच्या किंमतीवर फटका बसू शकतो. विशेष करुन शुद्धीकरणाच्या पायाभूत सुविधांवर याचा परिणाम होईल. कच्चा तेलाचा पुरवाठ देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेल व्यापारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त
Ans: व्हेनेझुएलाचे तेल हे हेवी आणि एक्स्ट्रा हेवी प्रकारत मोडते. हे ते API ग्रॅविटी जास्त असल्यामुळे जास्त गाढे असते. याचे शुद्धीकरण करण्यासाठी महागडी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया करावी लागते.
Ans: व्हेनेझुएलात ओरिनोको बेल्ट हा जगातील सर्वात जास्त कच्च्या तेलाचा साठा असणारे क्षेत्र आहे.
Ans: अमेरिकेतील तेल रिफाइनरीज मशीन या हेवी तेल प्रोसेस करण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेला केवळ तेलाचेच नव्हे, पेट्रोल, डिझेल, ग्रीसही बनवता येईल. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार, ज्यामुळे अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: व्हेनेझुएलाच्या तेलामुळे जागतिक बाजारात तेल क्षेत्रात संतुलन निर्माण होते. मात्र येथून तेलाचा पुरवठा कमी पडल्यास हेवी कच्चाय तेलाचे प्रमाण कमी होते, परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये जागतिक स्तरावर वाढ होते.
Ans: यामुळे तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि निर्यातेवर मर्यादा येते. तसेच तेलाच्या उत्पादन क्षमतेलाही कच्च्या तेलाची निर्यात घटल्याने फटका बसतो.






