वॉशिंग्टन: आज भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करता आहे. यानिमित्त अमेरिकेने भारताला स्वातंत्र्यदिनाच्या सुभेच्छा दिल्या आहेत. युनायटेड स्टेट्सचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताला देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेच्या सामायिक मूल्यांवर आधारित दोन्ही देशांमधील मजबूत संबंधावर प्रकाश टाकला आहे.
अँटनी ब्लिंकन यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ’15 ऑगस्ट रोजी भारत आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, मी अमेरिकेच्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. या महत्त्वाच्या दिवशी, आम्ही भारतीय लोकांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास आणि अमेरिका-भारत संबंधांचे उज्ज्वल भविष्य साजरे करत आहोत.’
अमेरिका-भारत संबंध अधिक मजबूत
अँटनी ब्लिंकन म्हणाले की “युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत कारण आम्ही मुक्त, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकचे आमचे सामायिक दृष्टीकोन पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत आहोत. हवामान आणि स्वच्छ ऊर्जेपासून संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानापर्यंत, यूएस-भारत द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि मजबूत झाले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही दिल्या शुभेच्छा
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Warm congratulations to Prime Minister Shri @narendramodi ji and the people of India on 78th Independence Day! 🇮🇳 May this day strengthen the bonds of friendship and cooperation between our nations. Looking forward to advancing Nepal-India relations.#IndependenceDayIndia
— K P Sharma Oli (@kpsharmaoli) August 15, 2024