
American citizens mocking ICE by putting his passport on his head
अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात
गेल्या महिन्यांपासून ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधीत (Illegal Immigration) कारवाई कडक केली असून लोकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले जात आहे. काही घटनांमध्ये लोकांवर गोळीबार करण्यात आला आहे, लहान मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, गरदोर महिलांवर जबरदस्ती करण्यात आली आहे. यामुळे लोकांमध्ये भिती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे लोक ट्रम्प सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला ७ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. यामध्ये व्हिडिओ बनवणाऱ्याने म्हटले आहे की, ही आमच्या फिरण्याची पद्धत आहे. आम्हाला कोणी तुम्ही अमेरिकेचे नागरिक आहात का हे विचारण्यापूर्वीच पासपोर्ट पाहून त्यांच्या लक्षात येईल. यामुळे आम्ही कपाळावर असेच पासपोर्ट लावून फिरत आहोत. मिनियापोलिसमध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या जबरदस्तीच्या कारवाईला विरोध करण्यासाठी लोकांनी हे पाऊल उचलले आहे. अलीकडेच आसीई अधिकाऱ्यांच्या कारवाईत दोन जमांचा मृत्यू झाला होता. यामुळे लोक जबरस्तीच्या कारवाईविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत.
अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सुमारे ६ लाख २२ हजार लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणेज गुन्हेगारीशी संबंध नसलेल्यांनाही डिपोर्ट केले जात आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) विभाने आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. येत्या २०२६ मध्ये इमिग्रेशन धोरण अधिक कडक होऊन मास डिपोर्टेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
An American citizen mocked ICE by putting his passport on his head and saying, Now we have to move like this in public.#USA#ICE pic.twitter.com/F6K7db0cPO — RawNewsByShaan (@ShaanUnfiltered) January 23, 2026
अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO