Donald Trump
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी आपल्या अनेक निर्णयांनी आणि व्यक्तव्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. नुकतेच ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) अनेक मोठे दावे केले होते. परंतु अमेरिकेन माध्यमांनी या दाव्यांची तथ्य तपासणी करुन दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमधील युद्ध (India Pakistan War) थांबवल्याच्या दाव्यांसह पाच दावे केले होते.
ट्रम्प यांचे पाच दावे आणि त्यांचे सत्य पुढील प्रमाणे
पहिला दावा
भारत पाकिस्तान युद्ध – डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष थांबवला असल्याचे श्रेय घेतले होते. पण भारताने याला स्पष्ट नकार गिला होता.ट्रम्प यांनी २० हून अधिक वेळा भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेतले होते. यावर पाकिस्तानने देखील ट्रम्प यांचे आभार मानले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. UNGA मध्येही त्यांनी हा दावा पुन्हा केला होता. तसेच यांसारखी इतर ६ युद्ध संपवल्याचे म्हटले. यामुळे नोबेल पारितोषिक त्यांना दिले जावे असेही सांगितले.
परंतु अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष करुन न्यूयॉर्क टाइम्सने सांगितले की,भारताने पाकिस्तानशी थेट चर्चा करुन संघर्ष थांबवला होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या हल्ल्यांच्या भीतीने युद्धबंदीसाठी विनंती केली होती. पाकिस्तानने सुरुवातील हे नाकारले होते. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दारा(Ishaq Dar) नुकतेच एका मुलाखतीत ट्रम्प यांनी युद्ध संपवले नसल्याचे म्हटले होते.
दुसरा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी UNGA मध्ये आणखी एक मोठा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की लंडनेच महापौर शरिया कायदा लागू करु इच्छिक आहे. परंतु अमेरिकन माध्यमांनी तथ्य तपासणी केल्यानंतर सांगितले की, लंडनचे महापौर सादिक खान यांनी असा कोणताही निर्णय घेतल्याचा पुरावा मिळालेला नाही.
तिसरा दावा
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत तिसरा मोठा दावा हा चीनवर केला. त्यांनी म्हटले की, चीन पवनचक्क्या बनवतो आणि स्वत वापरत नाही. तर जगभरात त्याचे टबाईन बांधून पाठवतो. चीन पवन उर्जेऐवजी कोळसा आणि गॅसचा वापर करतो असे ट्रम्प यांनी म्हटले होते.पण अमेरिकेन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनकडे सर्वाधिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे.
चौथा मोठा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी चौथा मोठा दावा हा पेट्रोल आणि डिझेलवर केला होता. त्यांनी म्हटले की, त्यांच्या कारकिर्दीत आमचे बिल कमी आले आहे आणि पेट्रोलचे दर घसरले आहे. पण अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तवात ट्रम्प यांच्या काळात विजेच्या दराता वाढ झाली आहेस तर गॅसच्या किंमतीमध्ये थोडीशी घसरण आहे. पेट्रोलचे दर आहे काही कमी झालेले नाहीत.
पाचवा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी UNGA मध्ये पाचवा मोठा दावा माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेयन यांच्यावर केला. त्यांनी म्हटले की, बायडेन प्रशासनात देशातील ३,००,००० मुले हरवली आङेत. यातील अनेकांची तस्करी करण्यात आली तर काहींचा मृत्यू झाला आहे. पण न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नाही. ही केवळ एक अतिशययोक्ती आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
डोनाल्ड ट्रम्प यांनी UNGA मध्ये काय दावा केला होता?
डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारत पाकिस्तानसह सात युद्ध थांबवल्याचा, तसेच शरिया कायद्यावर केलेला दावा, आणि इतर अनेक राजकीय व आर्थिक दावे केले होते.
अमेरिकेच्या कोणत्या वृत्तसंस्थेने केले डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची तथ्य तपासणी?
अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची तथ्य तपासणी केली आहे.
ट्रम्प यांनी कोणती युद्ध थांबवली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्धं थांबवली आहेत.