अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump on Wars : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची सवय झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरु, निर्णयावरुन, विधानावरुन ट्रम्प चर्चेत असतातच. नुकतेच त्यांनी H-1B व्हिसा शुल्कात वाढ करुन सर्वत्र खळबळ उडवली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी जागतिक शांततेसाठी सात युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांचे प्रमुख प्राधान्य जागतिक शांती प्रस्थापित करणे आहे. या दिशेने ते प्रयत्न करत असून राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी सात युद्ध संपवली आहे. सध्या ते रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, कोणालाही जे करता आले नाही, ते मी करुन दाखवले आहे. यामुळेच जगभरात तणाव कमी झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प नुकतेच ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले की, मी सात युद्ध थांबवली आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात कठीण आहे. मला वाटले होते पुतिन यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे ते सोपे असेल पण पुतिन यांना मला तोडांवर पाडले असा दावा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी म्हटले की, सध्या हे युद्ध अधिक गुंतागुतींचे आहे पण आपल्याकडे अजूनही वेळी आहे. हा प्रश्न नक्कीच सुटेल यासाठी त्यांनी चीनच्या शी जिनपिंग यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. ते नक्कीच मदत करतील असे ट्रम्प म्हणाले.
#BREAKING : Trump says that putin has let me down during UK Press conference pic.twitter.com/tRX6KrP9TY
— Dhruv Mishra (@DhruvMishra1607) September 18, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्रम्प यांनी सतत ही युद्ध थांबवल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा तर २० हून अधिक वेळा ट्रम्प यांनी केला आहे.संयुक्त राष्ट्राच्या वर्धापन दिना दिवशी देखील ट्रम्प यांनी जागतिक शांततेत त्यांचा मोठा वाटा असून त्यांनी सात युद्ध थांबवली असल्याचे म्हटले. यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचा मोठा हत असल्याचे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात सात युद्ध थांबवली आहेत. तसेच त्यांच्या जागतिक शांतते ही युद्ध थांबवल्यामुळे मोठा वाटा आहे.
ट्रम्प यांनी कोणती युद्ध थांबवली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह, इस्रायल-इराण थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान ही सात युद्धं थांबवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.