Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड

US Singer Mary Millben : बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि त्यांच्यावर भाजपच्या विजयाचे ट्रोलिंग आणि उत्सव साजरा करण्याचा आरोप केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 15, 2025 | 04:25 PM
american singer mary milben comments on rahul gandhi after bihar election results

american singer mary milben comments on rahul gandhi after bihar election results

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी बिहार निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसवर कठोर टीका केली.

  • एनडीएच्या दणदणीत विजयामुळे काँग्रेसला देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लाजिरवाणी परिस्थितीचा सामना करावा लागला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील विजयाचा उत्सव आणि सोशल मीडियावरील जागतिक प्रतिक्रिया चर्चेत.

US singer slams Congress : बिहार विधानसभा( Bihar Election Results) निवडणुकीतील निकालांनी भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने मिळवलेला दणदणीत विजय जिथे भाजपच्या राजकीय ताकदीची पुन्हा एकदा पुष्टी करतो, तिथे दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडीचा पराभव अधिकच ठळक बनवतो. परंतु या निकालांचे पडसाद केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाहीत. एक अनपेक्षित आणि चर्चेला वाव देणारी घटना म्हणजे अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवर केलेला थेट हल्लाबोल.

मेरी मिलबेन या लोकप्रिय अमेरिकन कलाकार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रशंसक म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी भारतीय संस्कृती आणि मोदी यांच्या नेतृत्वाचे अनेक वेळा सार्वजनिक कौतुक केले आहे. मात्र काही आठवड्यांपूर्वी त्यांना सोशल मीडियावर काँग्रेस समर्थकांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निकालांनंतर मिलबेन यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य करणारी पोस्ट शेअर करत कडवे शब्द वापरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अभूतपूर्व घटना! ‘हि’ अशी कोणती परीक्षा आहे ज्यासाठी ‘या’ देशाने चक्क रद्द केली 140 विमान उड्डाणे

X (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसकडे थेट बोट दाखवत लिहिले

“प्रिय राहुल गांधी, काँग्रेस आणि मला ट्रोल करणारे ‘गांधी गुंड’… आता माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप बिहारमध्ये विजयी होत आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे.”

Dear @RahulGandhi, @INCIndia, and all the “Gandhi Goons” trolling me on X several weeks ago and now following my friend PM @narendramodi and the @BJP4India sweeping the Bihar election today…. 👇 🇺🇸🇮🇳 pic.twitter.com/m7Li0iiPZG — Mary Millben (@MaryMillben) November 14, 2025

credit : social media

त्यानंतर काही तासांतच त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. भारतीय राजकारणातील एका राज्याच्या निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेतून आलेली प्रतिक्रिया अनेकांसाठी धक्कादायक होती. यामुळे काँग्रेसच्या पराभवाचा विषय आंतरराष्ट्रीय चर्चेचा भाग बनला. भारतीय राजकारण जगभरात किती बारकाईने पाहिले जाते याचे हे आणखी एक उदाहरण ठरले.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर विजयाचा उत्साह व्यक्त केला. टॉवेल हलवत त्यांनी विजयाचे स्वागत केले आणि बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानले.
मोदी म्हणाले

“लोकांनी खून केला आहे. बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा जंगलराज नाकारून विकासाचा मार्ग निवडला.”

जंगलराज वालों के पुराने सांप्रदायिक ‘MY’ फॉर्मूले को पूरी तरह ध्वस्त करते हुए बिहार की इस जीत ने एक नया सकारात्मक फॉर्मूला दिया है। अब MY का मतलब है- महिला और यूथ। pic.twitter.com/7ooQDPf244 — Narendra Modi (@narendramodi) November 15, 2025

credit : social media

भाजपने बिहारमध्ये तब्बल ९० जागांवर आघाडी घेत प्रभावी ताकद दाखवली. एनडीएचा हा विजय केवळ राजकीय यश नाही तर मोदींच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा झालेली देशव्यापी खातरजमा असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि महाआघाडीचा पराभव हा पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का ठरला आहे. देशात सतत घटत चाललेला आधार, संघटनेतील कमकुवतपणा, प्रमुख नेत्यांचा प्रभाव कमी होणे हे सर्व घटक आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत येऊ लागले आहेत. मेरी मिलबेन यांची पोस्ट याचा ताज्या उदाहरणांपैकी एक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Bangladesh संबंधात नवा ट्विस्ट; खलीलूर रहमान आणि अजित डोवाल भेट अन् शेख हसिनांचा अमेरिकेवर ‘यू-टर्न’

एकंदरीत, बिहार निवडणुकीचा निकाल केवळ सरकार स्थापनेपुरता मर्यादित राहिला नाही. भारताच्या राजकारणाला जागतिक रंग देत या निवडणुकीने चर्चेचे एक नवीन वळण घेतले. काँग्रेसवर झालेली बाहेरील टीका आणि भाजपच्या विजयाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला उल्लेख ही दोन्ही गोष्टी भारताच्या राजकीय बदलत्या समीकरणांची साक्ष देत आहेत.

Web Title: American singer mary milben comments on rahul gandhi after bihar election results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • America
  • Bihar Elections 2025
  • International Political news
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

India-Bangladesh संबंधात नवा ट्विस्ट; खलीलूर रहमान आणि अजित डोवाल भेट अन् शेख हसिनांचा अमेरिकेवर ‘यू-टर्न’
1

India-Bangladesh संबंधात नवा ट्विस्ट; खलीलूर रहमान आणि अजित डोवाल भेट अन् शेख हसिनांचा अमेरिकेवर ‘यू-टर्न’

Saudi-US : सौदीचा अमेरिकेकडे इतिहासातील सर्वात मोठा आग्रह; क्राउन प्रिन्सच्या ‘या’ चार अटींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष खिळले
2

Saudi-US : सौदीचा अमेरिकेकडे इतिहासातील सर्वात मोठा आग्रह; क्राउन प्रिन्सच्या ‘या’ चार अटींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष खिळले

ChinaNews : चीनने नागरिकांना दिला Japanला प्रवास न करण्याचा सल्ला; जपानी पंतप्रधानांच्या वक्तव्याने वादंग
3

ChinaNews : चीनने नागरिकांना दिला Japanला प्रवास न करण्याचा सल्ला; जपानी पंतप्रधानांच्या वक्तव्याने वादंग

Ukraine-Russia War : महायुद्धात युक्रेनचा दणदणीत प्रहार; स्वदेशी ‘फ्लेमिंगो’ क्षेपणास्त्राने घातला थेट रशियाच्या काळजाला घाला
4

Ukraine-Russia War : महायुद्धात युक्रेनचा दणदणीत प्रहार; स्वदेशी ‘फ्लेमिंगो’ क्षेपणास्त्राने घातला थेट रशियाच्या काळजाला घाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.