Another Temple vandalized in Bangladesh ahead of Durga Puja
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलदेशात (Bangladesh) पुन्हा एकदा अल्पसंख्यांक हिंदूना लक्ष्य करण्यात आहे. बांगलादेशात हिंदू मंदिरावर रविवारी (२१ सप्टेंबर) हल्ला करण्यात आला आहे. बांगलादेशाच्या जमालपूर जिल्ह्यात सरीशाबारी येथे दूर्गापूरजेपूर्वी एका हिंदू मंदिरात ही घटना घडली आहे. यामुळे बांगलादेशातील भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेला तीव्र निषेध केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील सात मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. दूर्गापूजेपूर्वी ही घटना घडली आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी देखील असाच एका मंदिरावर हल्ला झाला होतचा. सध्या या घटनेसाठी एका आरोपीला अटक करण्यात आली असून याची चौकशी सुरु आहे.
H-1B व्हिसा शुल्कात वाढ अन् भारतीयांना झाला मनस्ताप; तरुणांनी विमानामध्येच व्यक्त केला संताप, VIDEO
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिमलापल्ली गावातील असून त्याचे नाव हबीबुर रहमान आहे. रहमानने कारागीरांनी बनवलेल्या मुर्तींची तोडफोड केले आहे. मुर्तींचे डोके वर इतर भाग नष्ट केले आहेत. शनिवारी (२० सप्टेंबर) ही घटना घडली. याच्या दुसऱ्या दिवशी मंदिराच्या समितीच्या लोकांना मुर्तींचे नुकसान झाल्याचे आढळे आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
बांगलादेशच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू मंदिर समितीचे अध्यक्ष गोयेश चंद्र बर्मन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी रविवारी (२१ सप्टेंबर) मुर्त्यांच्या तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मंदिराबाहेरील सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. बर्मन यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही काळात बांगलादेशात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये अंतिरम सरकारची स्थापना झाली आणि यानंतर हिंदूवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
बांगलादेशात मंदिर तोडफोडीची घटना कुठे घडली?
बांगलादेशाच्या जमालपूर जिल्ह्यात सरीशाबारी येथील हिंदू मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त मिळाले आहे.
कोण आहे हिंदू मंदिरातील देवीच्या मूर्तींची तोडफोड करणारा आरोप?
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिमलापल्ली गावातील असून त्याचे नाव ३५ वर्षीय हबीबुर रहमान आहे, त्याच्यावर हिंदू मंदिरातील देवीच्या मुर्त्या तोडल्याचा आरोप आहे.
बांगलादेशात अशा घटनांमध्ये वाढ का होत आहे?
ऑगस्ट २०२४ मध्ये युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतिरम सरकार स्थापन झाले. यावेळी हिंदूवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. पण याविरोधात कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नाही. यामुळे अशा घटना करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.