तालिबानने केला महिलांचा आवाज बंद! अफगाण विद्यापीठातून स्रियांनी लिहिलेली पुस्तके न शिकवण्याचा फतवा जारी
Taliban Govenment Ban Womens Written Books : काबूल : तालिबानने (Taliban) पुन्हा एकदा महिलांचा आवाज दाबला आहे. तालिबानने महिलांच्या शिक्षणावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही निर्बंध लादले आहेत. अफगाणिस्तानच्या विद्यापीठांमधून महिलांनी लिहलेल्या पुस्तकांना काढून टाकले आहे. यामध्ये एकूण ६७९ पुस्तकांवक बंदी घालण्यात आली आहे. यातील जवळपास १४० पुस्तकेही महिलांनी लिहलेली आहेत.
तसेच लैंगिक अत्याचार, मानवाधिकार, पत्रकारिता, समाजातील महिल्यांच्या भूमिकांविषयीचे अभ्यासक्रमही शिक्षणातून वगळण्यात आले आहेत. तालिबान या सर्व गोष्टींनी शरिया आणि तालिबान धोरणांच्या विरोधी म्हणत बेकायदेशीर घोषित केले आहे. याचा उद्देश देशातील शिक्षणातून इराणी प्रभाव कमी करण्याचा आहे, असे तालिबान सरकाने म्हटले आहे. मात्र या बंदीचा परिणाम महिलांवर होत आहे.
तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी
यापूर्वी २०२४ मध्ये तालिबानने महिलांना नर्सिंग शिक्षण घेण्यावरही बंदी घातली आहे. तसेच सहावीनंतर मुलींना शिक्षण घेण्यासही मनाई आहे. तालिबानने एकूण १८ विषयांवर बंदी घातली असून यातील ६ विषय महिलांशी संबंदित आहे. यामध्ये लिंग आणि विकास, महिला समाजशास्त्र, तसेच तसेच समाजीत महिलांच्या भूमिकांविषयीचे अभ्यासक्रम काढून टाकण्यात आले आहे. तालिबान सरकारने दावा केल आहे की, हे सर्व विषयी इस्लामच्या तत्त्वाच्या विरोधात आहेत.
तालिबानने काही दिवसांपूर्वी देशातील १० प्रांतामध्ये वाय-फायवरही बंदी घाली आहे. हा निर्णय अनैतिक कृत्ये रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे तालिबानच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
काय आहे राजकीय हेतू
तालिबाननच्या महिलांच्या पुस्तकांवर बंदी घालण्यामागे मोठा राजकीय हेतू असल्याचे माने जात आहे. बंदी घातलेल्या ६७९ पुस्तकांपैकी ३१० पुस्तकेही इराणी लेखकांची होती. तालिबान सरकार अफगाण शिक्षणातील इराणी प्रभाव कमी करायचा आहे, याच हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याच तालिबानने स्पष्ट केले आहे. गेल्या काही काळात अफगाणिस्तान आणि इराणमधील संबंध स्थलांतरितांच्या मुद्यावरुन बिघडले आहेत. यामुळे हा राजकीय डाव असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र या निर्णयाचा प्रभाव अफगाण महिलांवर सर्वाधिक होत आहे. तालिबानी महिलांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. नर्सिंगचे शिक्षण बंद झाल्यामुळे अनेक महिलांना उपचार घेताना अडचणी येते आहे. कारण तालिबानमध्ये महिलांना गैर-कुटुंबातील पुरुषाला हात लावणे देखील बंद आहे. यामुळे त्यांना गर्भवकी महिलांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूंकपावेळी देखील या कारणामुळे बचाव अधिकाऱ्यांनी महिलांना मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अनेक महिला तासन्तास ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. अनेक महिलांना उपचारही मिळाले नव्हते.
तालिबाने कोणत्या आणि किती पुस्तकांवर घातली बंदी?
तालिबानने महिलांनी लिहिलेल्या पुस्तकांवर बंदी घातली आहे. यामध्ये ६७९ पुस्तके अफगाण विद्यापाठातून काढण्यात आली असून यतील १४० पुस्तके महिलांनी लिहिलेली आहेत.
तालिबानने किती अभ्यासक्रमांवर घातली बंदी?
तालिबानने, लैंगिक अत्याचार, मानवाधिकार, पत्रकारिता, समाजातील महिल्यांच्या भूमिकांविषयीचे अभ्यासक्रमांसह १८ अभ्यासक्रमांवर बंदी घातली आहे.
‘महिलांवरील निर्बंध रद्द करावेत’; तालिबानच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या मागणीने धरला जोर