Anthony Blunt was a Soviet spy Queen kept in dark over Palace traitor for years MI5 papers reveal
लंडन: एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या इंटेलिज्स एजन्सी MI5 ने 14 जानेवारी 2025 रोजी जाहीर केलेल्या एका फाइलमध्ये खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या एकजन्सीच्या अहवालानुसार, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा कला सल्लागार अँथनी ब्लंट हा सोव्हिएत संघाचा गुप्तहेर होता. धक्कादायक बाब म्हणजे, जवळपास एका दशकापर्यंत एलिझाबेथ राणीला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. तो त्यांच्या सोबत कार्यरत राहिला आणि सोव्हिएतला गुप्त माहिती पाठवत राहिला.
कँब्रिज फाईव्ह जासूस गटाचा भाग
मिळालेल्या माहितीनुसार, ही फाइल ब्रिटनच्या नॅशनल आर्काइव्जने जाहीर केली आहे. यामध्ये 1930 च्या दशकात कँब्रिज विद्यापीठाशी संबंधित एका गुप्तहेर गटाची माहिती समोर आली आहे. या गटाला कँब्रिज फाईव्ह” या नावाने ओळखले जात होते. तसेच या गटातील सदस्यांनी सोव्हिएत संघाला महत्त्वपूर्ण आणि गुप्त माहिती पुरवल्याचे उघड करण्यात आले आहे. अँथनी ब्लंट देखील या गटाचा एक सदस्य होता, ज्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात USSR ला ब्रिटनमधील गुप्त माहिती पुरवल्या होत्या. त्याच्या बदल्यात त्याला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले होते.
गुप्तहेर कसा उघडकीस आला ?
या अहवालानुसार, अँथनी ब्लंट बकिंगहम पॅलेसमध्ये अनेक वर्षे राणीचा कला सल्लागार म्हणून कार्यरत होा. मात्र, त्याच्या वर्तनामुळे सुरक्षा यंत्रणांना याचा संशय आला. त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली. अखेर 1964 मध्ये ब्लंटने कबूल केले की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान तो MI5 चा वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असताना, KGB साठी गुप्त माहिती पुरवत होता.
अँथनी ब्लंटने जासूस असल्याचे मान्य केल्याबद्दल त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का न लावण्याचे, नोकरी टिकवून ठेवण्याचे, तसेच नाइटहुड कायम ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे तो त्याच्या पदावर कार्यरत राहिला.
राणीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती
ब्लंटच्या जासूसूबद्दल राणी एलिझाबेथला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. 1972 मध्ये राणीच्या खासगी सचिव मार्टिन चार्टरिस यांनी MI5 च्या प्रमुखांना सांगितले की, राणीला ब्लंटच्या गुप्तहेरगिरीविषयी माहिती देण्यात काहीही अर्थ नाही. यामुळे केवळ त्यांची चिंता वाढेल आणि काहीच परिणाम साधता येणार नाही.
ही घटना ब्रिटनच्या राजघराण्यासाठी मोठा धक्का होती. इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीने गद्दारी केल्याचे कळल्यावरही, त्याला शिक्षा होण्याऐवजी संरक्षण मिळाले. हा प्रकार ब्रिटिश सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी दर्शवतो आणि राणीसमोरील आव्हाने अधोरेखित करतो.