Arab leaders meet in Egypt to oppos Trump's Gaza Resolution plan
कैरो: सध्या गाझात इस्त्रायल आणि हमासमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. याच दरम्यान इजिप्तमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझाचे पुनर्वसन आणि अमेरिकेचा त्यावर ताबा याला विरोध करण्यासाठी मंगळवारी (04 मार्च) अरब नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत गाझा पट्टी रिकामी करुन त्याला पर्यटन स्थळ बनवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पर्याय म्हणून एक विरोध प्रस्ताव सादर करण्यात आला. गाझा पट्टीला तेथील लोकांसाठी सुरक्षित ठिकाण बनवण्याची चर्चा या बैठकीत झाली.
या नव्या योजनेनुसार, गाझातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. लोकांसाठी तात्पुती मोबाईल घरे आणि शिबिरे उभारली जाणार आहेत. याशिवाय, गाझाचे पुनर्वसन होणार आहे आणि हमासने आपली सत्ता सोडून राजकीय दृष्ट्या स्वतंत्र अंतरिम प्रशासनाला हस्तांतरित करावी, असा मुद्दा या प्रस्तावात मांडण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी मागील महिन्यांत, गाझातील सुमारे 20 लाख रहिवाशांना इतर देशांमध्ये विस्थापित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. नेतर अमेरिकेने गाझाचे पुनर्विकास करुन मध्येपूर्वेचे रिव्हिएरा बनवण्याची कल्पना मांडली होती.
गाझातील लोकांना वैद्यकीय मदत
दरम्यान जॉर्डनने गाझातील मुलांना वैदय्कीय उपचारांसाठी आपल्या देशात आणले आहे. गाझातील अनेक रुग्णालये हल्ल्यांमुळे नष्ट झाली आहेत. यामुळे नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 43 नातेवाईकांसह इस्त्रायल मार्गे जॉर्डनमध्ये आणण्यात आले. जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय यांनी ट्रम्प यांच्यासोबत केलेल्या चर्चेत 2 हजार गाझातील मुलांना वैद्यकीय मदतीसाठी स्वीकारण्याची ऑफर दिली होती.
शिवाय जॉर्डन आणि इजिप्तने ट्रम्प यांच्या गाझाला पर्यटन स्थळ बनवण्याच्या योजनेला ठामपणे विरोध दर्शवला. त्यांनी दोन्ही देशांतील रहिवाशांना स्वीकारण्यास सांगितले होते, मात्र या देशांनी या प्रस्तावाला विरोध करत गाझातच मदत पोहोचवण्यावर भर दिला.
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती देशाचा पाठिंबा
कैरोमध्ये सुरु असलेल्या अरब नेत्यांच्या बैठकीत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश सहभागी झाले आहेत. ट्रम्प यांच्या योजनेला विरोध करण्यासाठी यो दोन्ही देशांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.
इस्त्रायलचा गाझावर हल्ला
याचदरम्यान इस्त्रायलने गाझात पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे. यामुळे विनाशाचे नवे वादळ उभे राहिले आहे. हमासने युद्धंबदीच्या दुसऱ्या टप्प्यातील अटी मान्य करण्यास नकार दिल्याने इस्त्रायलने हे हल्ले केले आहेत. इस्त्रायलने युद्ध करार तोडण्याची घोषणा केली असून गाझावर चारी बाजून हल्ला केला आहे. एवढेच नव्हे तर गाझाला मिळमारी मानवतावादी मदतही इस्त्रायलने बंदी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात पुन्हा एकदा विनाशाचे वादळ; इस्त्रायलचा भयानक हल्ला