खार्तूम : सुदानमध्ये (Sudan) 2700 वर्ष जुन्या एका मंदिराचे अवशेष पुरातत्व तज्ञांनी शोधले आहेत. या परिसरात जेव्हा 2700 वर्षांपूर्वी कुश नावाचे विशालकाय राज्य अस्तित्वात होते, त्यावेळी या हे मंदिर अस्तित्वात होते, असे सांगण्यात येते आहे. या कुश राज्यात आजचे सुदान, इजिप्त आणि मध्य पूर्वेतील (Middle East) देशांचा काही भाग होता. या मंदिराचे अवशेष ओल्ड डोंगोला या जुन्या गडावर सापडले आहेत. सुदानच्या नील नदीच्या तिसऱ्या आणि चौथ्या प्रवाहाच्या मध्ये मोतियाबिंद या परिसरात हे मंदिर सापडले आहे. (Temple In Muslim Country)
मंदिराच्या दगडांवर शिलालेख
मंदिरातील काही दगडांवर चित्रलिपीतील शिलालेखही सापडले आहेत. तर काही दगडांवर शिल्प साकारलेली आहेत. या सगळ्याचं परीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर इसवी सनपूर्व पहिल्या सहस्त्रकातील सुरुवातीच्या काळातील ही मंदिराची रचना असल्याचं सांगण्यात येतंय. या भागात असलेल्या विद्यापीठात पुरातत्व विभागात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी या मंदिराच्या अवशेषाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. ओल्ह डोंगोला या परिसरात 2700 वर्ष जुनी अशी कोणतीच वस्तू सापडलेली नाही, असा त्यांचा दावा आहे.
मंदिरात कोणत्या देवतेची होत होती पूजा
मंदिराच्या काही अवशेषांत मंदिराच्या उभारणीतील काही दगड संशोधकांना मिळाले आहेत. त्या दगडांच्या अभ्यासानुसार हे मंदिर कावाच्या अमुन रा या देवतेचे आहे. या रिसर्च टीममध्ये असलेल्या इजिप्तच्या एका वैज्ञानिकानं मेलद्वारे ही माहिती कळवली आहे. अमुन-रा या देवनतेची कुश आणि इजिप्तमध्ये पूजा होत असे. कावा हे सुदानमधील पुरातन स्थळ आहे, ज्यात एक मंदिर होते. आता सापडलेले हे अवशेष त्याच मंदिराचे आहेत का, की दुसऱ्या मंदिराचे आहेत, याचा शोध सुरु आहे.
या शोधामुळे निर्माण झाले अनेक प्रश्न
या मंदिराचे अवशेष आणि शिलालेख सापडल्यानं अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मंदिराचा नेमका कालावदी काय होता, याचा शोध घेण्याची गरज असल्याचं सुदानमध्ये काम करणाऱ्या जुलिया बुडका यांनी व्यक्त केली आहे. ओल्ड डोंगोला या पर्वतावर खरंच मंदिर अस्तित्वात होते की या मंदिराच्या अवशेषांना कावातून किंवा इतर कुठल्या ठिकाणावरुन आणण्यात आले होते का, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.