Astronaut Sunita Williams Says This is the most difficult time Of Being Stranded In Space
वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी बूच विल्मोर देखील अंतराळात अडकले आहे. दरम्यान सुनिता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्री अंतराळ स्थानकातून पत्रकार परिषदेत एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून म्हटले आहे की, पृथ्वीवर त्यांच्या परत येण्यात पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “सगळ्यात कठीण बाब म्हणजे, पृथ्वीवरील लोकांना आमच्या परत येण्याबद्दल काही माहिती नाही. त्यांच्यासाठी हा एक भावनिक प्रसंग आहे. कदाचित आमच्यापेक्षाही जास्त.” हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे.
तांत्रिक अडचणींमुळे परत येण्यास विलंब
सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 मध्ये बोइंट स्टारलाइनर कॅप्सूलमधून अतंराळात गेले होते. जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून सुनीता विल्यम्स आणि विल्मोर ISSवर पोहोचले होते. ही मोहिम केवळ 8 दिवसांची होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक काळ अंतराळात राहावे लागले. स्टारलाइनरला हेलियम गळती आणि थ्रस्टर बिघाड यासारख्या समस्या आल्याने अंतराळयान परतीसाठी सुरक्षित राहिले नाही.
यामुळे नासाने आता दोन्ही अंतराळवीरांना मार्च 2025 अखेरीस स्पेसएक्सच्या अंतराळयानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्स कंपनीवर सोपवली आहे. सध्या मार्च 2025 च्या अखेरपर्यंत सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे. स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन मिशनच्या मदतीने त्यांना पृथ्वीवर परत आणले जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेनवर टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्मप यांनी सुनिता विल्यम्सच्या परत येण्याच्या विलंबसाठी जो बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले होते की, “मी मस्कला दोन्ही शूर अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जो बायडेन यांच्यावर टीका करत, बायडेन प्रशासनाने त्यांना अंतराळातच सोडले असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या परत येण्यास विलंब होणार नाही अशी हामी देखील ट्रम्प यांनी दिली होती.
एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेक्राफ्टच्या मदतीने दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यात येणार आहे. नासाने डिसेंबर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांसाठी हा प्रवास अत्यंत खडतर आहे. सध्या त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ते लवकरच पृथ्वीवर सुखरुप परतीतल अशी आशा आहे.