Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सुदैवाने या निदर्शनांमध्ये कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या इराणच्या हमेदा येथे पोलिस आणि जनतेमध्ये संघर्ष सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही निदर्शने सुरु आहे. या निदर्शनांमध्ये पोलिस आणि सुरक्षा दलांशी नागरिकांची चकामकही झाली आहे. बुधनारी (३१ डिसेंबर २०२५) इराणमध्ये अनेक प्रांतामध्ये सरकारी कार्यालये, बाजापेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. इराणची राजधानी तेहरानमध्ये ग्रँड बाजार, कमर्शियल सेंटर आणि अलादीन मॉल बंद करण्यात आले होते.
इराणचे चलन रियाल अमेरिकेच्या तुलनेत अधिक घसरले आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. यामुळे जनरेशन झेडच्या तरुणांनी या वाढत्या महागाईविरोधात, आर्थिक समस्यांविरोधात निदर्सने सुरु आहेत. तसेच यामध्ये देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्याविरोधात लोकांनी संपात व्यक्त केला आहे.
सध्या डॉलरची किंमत १४४,००० तोमनपर्यंत पोहोचली आहे. पण याच्या तुलनेत इराणचे चलन रियाल कमी झाले आहे. यामुळे व्यवासायात अनिश्चित निर्माण जाली आहे. परिस्थिती बिघडत चालल्यामुळे इराणच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे. इराणी सरकार लोकांवर सध्या कर लादण्याची तयारी करत असून याविरोधात लोकांनी बंड पुकारला आहे. इराणने या सर्व परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे.
दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी या निदर्शनांवर प्रतिक्रिया देत, सरकार आंदोलकर्त्यांशी वाटाघाटीचा प्रयत्न करत असल्याचे म्हचले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सध्या युद्धात गुंतलो आहोत, शत्रूने आर्थिब दबाव आणत आम्हाल पराभूत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इराण या आर्थिक दबाला झुकणार नाही. असे मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे.
Iran’s youth are moving to the front lines.
Fear gone.
A generation openly calling for the overthrow of Khamenei and his regime. pic.twitter.com/SxVJJx8iVh — Aidin Panahi | آیدین پناهی (@Aidin_FreeIran) December 31, 2025
इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?






