Azerbaijan's four major action in 48 hours aginst Russia, Putin expressed anger
Azerbaijan-Russia Relations : बाकु : एक मोठी बातमी समोर येत आहे. आखाती देश अझबैजानने रशियाविरोधात ४ मोठ्या कारवाया केल्या आहेत. यामुळे पुतिन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रशिया आणि अझबैझानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठ्या सैन्य आणि अणुबॉम्ब असणाऱ्या रशियाने अझरबैजानला याचे चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये रशियाने चेचियामध्ये एक विमान पाडले होते. यामध्ये ३२ अझरबैजानच्या नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्लाचा अझरबैजानने लेखी निषेध केला आहे. आमच्या नागरिकांची जाणूनबुजून हत्या करण्यात आल्याचे अझरबैजानने म्हटले आहे. यामुळे हा वादा सुरु झाला आहे.
खरं तरं रशिया आणि अझरबैजान हे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. परंतु दोन्ही देशांमध्ये अमेरिकेमुळे मोठा वाद आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये आर्मेनियावरुन प्रादेशिक संगर्ष सुरु आहे. अझरबैजान आर्मेनियाविरुद्ध लढत आहे, तर रशियाने आर्मिनियाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी अझरबैजानने रशियाकडे मैत्रीपूर्ण संबंधसाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु रशियाने याला नकार दिला होता. सध्या अझरबैजानच्या कारवाईमुळे रशियामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणावात वाढ होण्याची शक्यता आहे.