'या' देशाची तालिबान विरोधात मोठी कारवाई; लाखो अफगाण निर्वासितांना केले देशातून हद्दपार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran News marathi : तेहरान : इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान इराणने एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणने तालिबानविरोधात मोठी कारवाई केली आहे. इराणने देशातील अफगाण नागरिकांना देशातून हद्दपार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ७ लाख अफगाणिस्तान निर्वासितांना ६ जुलैपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेच यामध्ये अनेक दशकांपासून इराणनमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.
इराणने सर्व अफगाण निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परत जाण्याचे निर्देश दिले आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र आणि अफगाणिस्कतानच्या अधिकाऱ्यांनी इराण या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढत असल्याचे म्हटले आहे. तर इराण सरकारने लोक स्वइच्छिने मायदेशी परत जात असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ६.९ लाख अफगाणनर्विसित मायदेशी परतेले आहेत. एकट्या जून महिन्यात २.३ लाख अफगाणींनी इराण सोडले आहे.
इराणमधून बाहेर काढलेल्यांसाठी एक तात्पुरते संक्रमण केंद्र देखील उभारले आहे. या ठिकाणी अफगाण लोकांच्या अन्न, पाणी, आणि एक दिवसाच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संसधानांमची मदत पोहचवली जात आहे. इराणमध्ये अफगाण लोकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता परत करण्यासाठी सध्या तालिबान सरकार इराणी सरकारशी चर्चा करत आहे.
या वर्षी आतापर्यंत १० लाखांहून अधिक अफगाण नागरिक पाकिस्तान आणि इराणमधून परतले आहे. इराणने दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकट्या इराणमधून ४० लाखा अफगाणिस्तान लोक प्रभावित होऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. सध्या या महिलांना अफगाणिस्तानच्या तालिबानी नियमांचाही सामना करावा लागत आहे. यामुळे देशात परतलेल्या लोकांना तालिबानी नियमांशी जुळवून घेणे कठीण जात आहे.
दुसरीकडे इराणने इस्रायलशी युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक गुप्तहेरांना अटक केली आहे. यापैकी सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला हा मोठा धक्का आहे. इराणची ही कारवाई अद्याप सुरु आहे. सध्या इस्रायल आणि इराणमधील तणाव कायम आहेच.