Balen Shaha Mayor of Kathmandu Gen Z Face Nepal Protest
Balen Shah : काठमांडू : सध्या नेपाळमध्ये हालाकीची परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून Gen Z जनरेशनचे सरकारविरोधी तीव्र आंदोलन सुरु आहे. पंतप्रधान आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. याच वेळी काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी केली जात आहे. सध्या तरुणांमध्ये बालेन शाहची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यांच्या या लोकप्रियतेमागे त्यांची नेपाळमधील कामगिरी आहे. रॅपर ते महापौर असा त्यांचा हा प्रवास असून त्यांनी नेपाळमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मोहीम राबवल्या आहेत. आज आपण बालेन शाह यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.
बालेन शाह हे आज नेपाळच्या तरुण पिढीचे आयकॉन मानले जात आहे. त्यांनी भष्ट्राचार, असमानता, गरिबी आणि राजकीय मुद्यांवर रॅप सॉग्स लिहिली होती. २७ एप्रिल १९९० मध्ये काठमांडू मध्ये बालेन शाहचा जन्म झाला. त्यांनी भारतात इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय बालेन यांनी २०२२ मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली.
त्यांनी कॉंग्रेस आणि UML या नेपाळमधील मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना हजारो मतांनी पराभूत केले. दरम्यान त्यांनी महापैर झाल्यानंतर अनेक देशात अनेक मोहीम राबवल्या. त्यांनी डोजरक अभियानापासून आपल्या कामाची सुरुवात केली.
२०२३ मध्ये टाइम मॅगझीनने त्यांना टॉप १०० इमर्जिग लीडर्सच्या यादीत सामाविष्ट केले. त्यांची लोकप्रियता जागतिक स्तरावरही पोहोचली. आजही नुकत्याच झालेल्या आंदोलानाचा प्रमुख चेहरा म्हणून ते ओळखले जातात.