Nepal Political Crisis : पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर, आता नेपाळची सूत्रे कोणाच्या हाती? ही नावे आली समोर, जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Political Crisis : सध्या नेपाळवर मोठे राजकीय संकट उभारले आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या राजीनामा स्वाकरही केला आहे. सरकारविरोधात सुरु झालेल्या तरुणांच्या आंदोलनामुळे पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. परंतु अद्यापही आंदोलन थांबलले नाही. पंतप्रधानांसह इतर अनेक नेत्यांनी देखील राजीनामा दिला आहे.
नेमकं काय घडलं?
यापूर्वी आपण नेमकं काय घडलं हे जाणून घेऊ. नेपाळच्या सरकारने ४ सप्टेंबर रोजी २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी लागू करण्यात आली होती. यामुळे तरुणांनी सरकारविरोधी आंदोलन सुरु केले होते. शिवाय यासाठी केवळे एवढेच कारण नाही. ओली शर्मा यांचे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक घोटाळे, भष्ट्राचार नेपोटिझम यांसारख्या घटना घडत होत्या. यामुळे सोशल मीडियावर बंदी केवळ वादाची ठिणगी बनली आहे, तीव्र आंदोलन पेटले. देशाच्या संसद भवनाच्या बाहेर जाळफोळ करण्यात आला.
सध्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर सत्ता कोण हाती घेणार असा प्रश्न पडला आहे. यावेळी दोन महत्वपूर्ण नावे समोर आली आहेत. एक आंदोलनाचे नेतृत्व करणारा काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह (बालेन शाह) आणि नेपाळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. कोइराला यापैकी कोणी एक सत्ता हाती घेऊ शकतात असे म्हटले जात आहे.
तरुणांचा नेता- बालेन शाह
बालेन शाह हा काठमांडूचा महापौर आहे. तरुणांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता असून सध्या त्याच्या हाती नेपाळची सुत्रे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बालेन शाहला नेपाळच्या राजकारणातील सर्वात तेजस्वी चेहरा म्हणून ओळखले जाते, तसेच त्याचा युवा नेता म्हणूनही ओळखले जाते.
२०२३ मध्ये टाईम मासिकाने बालेन शाह याचे नाव जगातील टॉप १०० व्यक्तीमत्त्वाच्या यादीत त्याचे नावही समाविष्ट केले आहे. द न्यू यॉर्क टाईम्ससह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यामांनी त्याच्या कामाबद्दल आणि प्रभावाबद्दल लिहिले आहे. तरुणांमध्ये सोशल मीडियावर त्याची सतत उपस्थिती असते.
बालेनने आपल्या करियरची सुरुवात इंजनियरींगमधून केली होती. नंतर त्याने रॅपर म्हणून आणि आपली ओळख निर्माण केली आणि नंतर राजकारणात प्रवेश केला. त्याने काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. सध्याच्या आंदोलनामागे त्याचा मुख्य चेहरा असल्याचेही मानले जात आहे.
शेखर कोइराल
याच वेळी आणखी एक नाव समोर येत आहे. ते म्हणजे शेखर कोइराल यांचे. शेर कोइराला हे पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि नेपाळच्या दुसऱ्या संघराज्य संसदेचे खासदार आहेत. नेपाळच्या मोरंग जिल्ह्यात त्यांना मजबूत पाठिंबा आहे. त्यांना राजकीय तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जाते.
त्यांनी आरोग्य विज्ञान संस्थेचे कुलगुरू म्हणून कार्य केले आहे. सध्या त्यांच्याकडे कार्यकारी समितीमध्ये सर्वाधिक मते आहे. त्यांनी पक्षाच्या १४ व्या अधिवेशनात शेर बाहादूर देऊबा यांनी अध्यक्षपदासाठी आव्हान दिले होते. पण ते पराभूत झाला. परंतु तरुणांमध्ये त्यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. कॉंग्रस सत्तेसाठी त्याचेही नाव आघाडीवर आहे.