Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला 'हा' इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानांतर त्यांनी देशाला नवीन बांगलादेश निर्माण करण्याची संधी मिळाले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकांना उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी निवडणुकीला बांगलादेशचा नवा जन्म म्हणून संबोधले असून लोकांनी जुन्या राजवटीला नाकारले असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांनी युनूस यांनी आपल्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारवर निशाना साधला आहे.
Bangladesh interim Chief Adviser Muhammad Yunus casts vote in historic election Read @ANI Story | https://t.co/3vU5lgyc3s#MuhammadYunus #Bangladesh #BangladeshElections pic.twitter.com/g6tWLRbbk5 — ANI Digital (@ani_digital) February 12, 2026
याशिवाय बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार तारिक रहमान यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदान केले आहे. मतदानादरम्यान त्यांनी, महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, BNP चे पहिले प्राधान्य हे महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे राहिल. तसेच मागील सरकारने देशाचे नुकसान केले असून त्यांचा पक्ष सत्तेत आला तर बांगलादेशची पुनर्बांधणी आणि सुरक्षा मजबूत करण्यावर भर देईल असेही रहमान यांनी म्हटले. तसेच जमात-ए-इस्लामीच्या प्रमुखांनी देखील मतदानाचा हक्का बजावला आहे. जमातचे नेते शफीकुर रहमान यांनी लोकांना मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.
पण याच वेळी बांगलादेशात रक्तरंजित खेळही सुरु आहे. खुलाना येथे बांगलादेश नॅशन पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांमध्ये झटापट झाली आहे. या संघर्षात BNP पक्षाच्या एका नेत्याचा मृत्यू झाला आहे. याच वेळी मुन्शीगंज-३ आणि गोपालगंज सदर भागात मतदान क्रेंद्रांबाहेर देखील बॉम्ब स्फोट झाला असल्याचे वृत्तही समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. सध्या या स्फोटात एक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याला आणि १४ वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाले असल्याचे वृत्त मिळाले आहेत.
Scuffle reported at Mirpur, during Bangladesh Elections. But no major incident of violence reported in the country so far since voting began earlier today. pic.twitter.com/gTPEnCAVQy — Sidhant Sibal (@sidhant) February 12, 2026
Ans: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसचे त्यांनी लोकांना मतदानात उत्साहाने सहभागी होण्यास सांगितले आहे. याशिवाय बांगलादेशचा नवा जन्म झाला असून जुन्या राजवटीला लोकांनी नाकारले असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे हसीना सरकारवर निशाणा साधला आहे.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत बांगलादेशात ३३% मतदान झाले असून ३२,००० मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे.






