
Bangladesh National Citizens Party central leader Mohammad Motaleb Sikdar was shot at by unknown assailants
NCP leader attack Bangladesh latest news : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय वणवा विझण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश पेटलेला असतानाच, सोमवारी (दि. 22 डिसेंबर 2025) खुलना शहरात आणखी एका मोठ्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राष्ट्रीय नागरिक पक्षाचे (NCP) केंद्रीय नेते मोहम्मद मोतालेब सिकदर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात सिकदर गंभीर जखमी झाले असून त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. या घटनेने बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि मोहम्मद युनूस यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
सोमवारी (दि. 22 डिसेंबर 2025) सकाळी खुलना शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ असताना, दुचाकीवरून आलेल्या काही मुखवटाधारी हल्लेखोरांनी मोतालेब सिकदर यांना लक्ष्य केले. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि हल्लेखोर काही क्षणात पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिकदर यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशभरात जो तणाव निर्माण झाला होता, तो या नवीन हल्ल्यामुळे अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Turkey Parliament बनली ‘रणांगण’! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी
उस्मान हादी यांच्या हत्येनंतर बांगलादेशातील कट्टरपंथी संघटनांनी मोहम्मद युनूस सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. जबाबदारांना अटक करण्यात “दृश्यमान प्रगती” करा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, रविवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादी यांच्या मारेकऱ्यांबाबत त्यांच्याकडे अद्याप कोणतीही “ठोस माहिती” नाही. पोलिसांचे हे हतबलपण आणि त्यानंतर झालेला सिकदर वरील हल्ला यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
BIG BREAKING 🚨 Hardliner Bangladeshi leader Motaleb Sikdar has been SHOT DEAD by UNKNOWN MEN. Few days ago, UNKNOWN MEN killed radical Osman Bin Hadi. Bangladeshi Police of Yunus is clueless about UNKNOWN MEN. https://t.co/VLhVWrLEwu pic.twitter.com/jFAeLM2RJB — News Algebra (@NewsAlgebraIND) December 22, 2025
credit : social media and Twitter
भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हसीना म्हणाल्या, “युनूस यांनी अतिरेक्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे आणि तुरुंगातील खतरनाक दहशतवाद्यांना मोकळे सोडले आहे. यामुळेच बांगलादेशात आता हिंसाचार ही एक सामान्य गोष्ट बनली आहे.” त्यांच्या मते, हे अराजकता केवळ बांगलादेशासाठीच नाही, तर भारतासह सर्व शेजारील देशांच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terrorist Attacks : नवीन वर्षाच्या जल्लोषावर ISISचे सावट; जागतिक स्तरावर हल्ल्यांचा मोठा कट, ‘AI’ चा वापर करून दहशतवादी देणार चकवा
१२ डिसेंबरला ढाक्यात उस्मान हादी यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती, ज्यांचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आता मोतालेब सिकदर यांच्यावर झालेला हल्ला हे सिद्ध करतो की, बांगलादेशात आता कोणाचेही आयुष्य सुरक्षित नाही. राजकीय वैमनस्य आणि कट्टरवादाच्या विळख्यात अडकलेला हा देश आता पुन्हा एकदा गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र दिसत आहे.
Ans: राष्ट्रीय नागरिक पक्षाच्या (NCP) केंद्रीय कामगार संघटनेचे नेते मोहम्मद मोतालेब सिकदर यांच्यावर सोमवारी गोळीबार करण्यात आला.
Ans: उस्मान हादींच्या मृत्यूनंतर देशात प्रचंड हिंसाचार आणि अराजकता निर्माण झाली असून, जनतेने सरकारला मारेकऱ्यांना पकडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
Ans: हसीना यांनी आरोप केला आहे की, युनूस यांनी दहशतवाद्यांना मंत्रिमंडळात जागा दिली असून ते देशातील हिंसाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.