Bangladesh News BNP leader shot dead in Bangladesh
ढाका: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरता असताना एका स्थानिक बीएनपी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मीडिया रिपोर्टनुसार, खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे नेते कमरुल अहसान सादोन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादोन घराबाहेर रस्त्याच्या कडेला उभे राहून लोकांशी चर्चा करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पळ काढला. शादोन यांनी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत् घोषित केले. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिस गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहे. हत्येमागील कराम अद्याप अस्पष्ट आहे.
अलकीडच्या काही काळात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या घटनांमद्ये वाढ झाली आहे. बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतरिम सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेत युनूस सरकार अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
जानेवारी 2025 पासून बांगालदेशात हत्या, अपहरण आमि दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केवळ सामन्य नागरिकच नव्हे तर सरकारी अधिकारी देखील असुरक्षित आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आणि लोकांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली जात आहे.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या कार्यकाळापासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. जुलै 2024 मध्ये कोटाविरोधी आंदोलन सुरु झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला. अल्पसंख्याकीय हिंदू आणि बौद्ध लोकांवर हल्ल्याच्या घटनांमझ्ये वाढ झाली. तेव्हापासून आजपर्यंत बांगलादेशात हजारो हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या राजकीय अस्थिरतेदरम्यान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युनूस यांनी दहशतवाद्यांच्या मदतीन सत्ता काबीज केली असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. तसेच बांगलादेश अमेरिकेला विकत असल्याचाही आरोप हसीना यांनी केला आहे. मोहम्मद युनूस यांच्या पाय उताराची मागमी केली जात आहे. बांगलादेशात राजकीय बंडाचे वातावरण निर्माण झाले आहे.