कोटाविरोधी आंदोलनापासून ते युनूस यांच्या राजीनाम्यापर्यंत..; जाणून घ्या बांगलादेशच्या आतापर्यंतच्या प्रुमख घडामोडी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशात गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु आहे. शेख हसीना यांच्या सत्तापालटापासून बांगलादेशात गोंधळ सुरु असून पुन्हा एकदा मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. गेल्या काही काळात बांगलादेशमध्ये अशांतता पसरलेली आहे. कोटाविरोधी विद्यार्थी आंदोलन, शेख हसीन सरकारचे सत्तापालट, अल्पसंख्याकीय हिंदू आणणि बौद्ध धर्मातील लोकांवर अत्याचार अशा अनेक गोष्टी बांगलादेशात घडून गेल्या आहेत. आज आपण शेख हसीनांच्या सत्तापालटापासून ते युनूस यांच्या राजीनाम्यापर्यंत घडलेल्या घटनांवर एक नजर टाकणार आहोत.
जुलै २०२४ मध्ये बांगलादेशमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या कोटा प्रणाली विरोधात आंदोलन सुरु केली होते. या कोटा प्रणालीत बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% आरक्षण मिळत असे. परंतु यामुळे इतर मुले वंचित राहत होती. यामुळे या विरोधात आंदोलने सुरू झाली. सुरुवातीला ही निदर्शने अहिंसक मार्गाने सुरु होती. परंतु सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आणि या अहिंसक आंदोलनाचे रुपांतर हिंसक संघर्षात झाले.






